DA Arrears : 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत मोठं अपडेट, 3 टप्प्यात खात्यावर जमा होणार 11,880 रुपये; पहा, कॅल्क्युलेशन
नोव्हेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगला ठरण्याची चिन्हे दिसत आहे. या महिन्याच्या अखेरीस 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत कॅबिनेट सचिवांसोबत बैठकीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनचे प्रतिनिधी सचिवांना थकबाकी खात्यावर जमा करण्यासाठी विनंती करणार आहेत. मात्र, सरकार सरकार थकबाकी जमा करण्यासाठी सहमती देईल की नाही ? हे मात्र अजून ठरलं नाहीये. कारण, यापूर्वीही एकदा सरकारने थकबाकी जमा करण्यास इन्कार केला आहे. सूत्रांनुसार, पेन्शनर्स आणि कर्मचारी संघटनेच्या दबावानंतर कॅबिनेट सचिवांनी या विषयावर बैठक बोलावली असल्याने हा निकाली लागण्याची शक्यता आहे.
तीन हप्त्यांपैकी 11% रक्कम आहे थकीत. .
जानेवारी 2020 ते जून 2021 मधील केंद्रीय कर्मचार्यांचे तीन हप्ते मिळालेले नाहीत. हे प्रमाण 11% आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन उघडल्यानंतर सरकारने फ्रीज डीएवरील बंदी उठवली. परंतु, जुलै 2021 नंतर वाढीव महागाई भत्ता देण्यात आला. परंतु, 18 महिन्यांच्या कालावधीचा पैसा मिळाला नाही.
सरकारने फक्त एवढंच सांगितलं की,महागाई भत्ता फ्रीज होता त्यामुळे या कालावधीचा पैसा मिळणार नाही. डीएमधील वाढ जुलै 2021 पासून लागू झाली आहे. सध्या तो काट्यावर जमा केला जात आहे.
सुप्रीम कोर्टही कर्मचाऱ्यांच्या बाजूने. .
हा आमचा हक्क आहे, त्याचे पैसे रोखू नये, अशी मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे. थकबाकी भत्त्याच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दादही मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचार करण्यास सांगितले होते की, हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, तो गोठवला जाऊ शकतो पण थांबवता येणार नाही. पेन्शनधारकांनी त्यांच्या डीआर थकबाकीबाबत पंतप्रधान मोदींकडेही आवाहन केलं आहे. आता दीड वर्षाच्या थकबाकीबाबत सरकारशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.
डीए थकबाकीतून किती मिळणार पैसे ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी मिळाल्यास त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. अंदाजानुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा म्हणाले की, वेगवेगळ्या वेतन स्तरांवर कर्मचाऱ्यांचे पेमेंट वेगवेगळे असेल. परंतु लेव्हल-3 मधील कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी 11,880 ते 37,554 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
तर, स्तर-13 (मूलभूत वेतन श्रेणी रु. 1,23,100 ते रु. 2,15,900) किंवा स्तर-14 साठी, कर्मचार्यांची थकबाकी रु. 1,44,200 ते रु. 2,18,200 च्या दरम्यान असू शकते. मात्र, सरकारशी वाटाघाटी करूनही तोडगा निघू शकतो. मग ही आकडेवारीही बदलू शकते.
तीन हप्त्यांत मिळणार 4320+3240+4320 = 11880 रु.
केंद्रीय कर्मचार्यांचे वेतन मॅट्रिक्सनुसार किमान वेतन 18000 रुपये असल्यास, त्यांना थकबाकी म्हणून 11,880 रुपये (रु. 4320+3240+4320) मिळतील. यामध्ये, लेव्हल-1 मूलभूत वेतनश्रेणी श्रेणी 18000 ते 56900 नुसार, केंद्रीय कर्मचारी यांना किमान ग्रेड वेतनासह जानेवारी ते जुलै 2020 पर्यंत पहिला हप्ता 4320 रुपये असेल.
तर, जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत डीएची थकबाकी 3,240 रुपये असेल. त्याच वेळी, जर आपण जानेवारी ते जुलै 2021 मधील डीए थकबाकीची गणना केली तर ती 4,320 रुपये होईल.