Take a fresh look at your lifestyle.

मारुती XL6 आता CNG मध्ये, 26Km पेक्षा जास्त मायलेज; पहा जबरदस्त फीचर्स अन् किंमतही स्वस्त..

0

देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने आता आपली फॅमिली कार XL6 CNG व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केली आहे. हे मॉडेल पेट्रोल इंजिन सोबतच आता सीएनजीचा पर्याय असल्याने त्याची विक्रीही वाढण्याची अपेक्षा आहे. मारुती सुझुकीकडे CNG सेगमेंटमधील सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. 

XL6 कॅप्टन सीट्ससह भेटते त्यामुळे कार मधील स्पेस अगदी वाखाणण्याजोगा आहे. तसेच या कारची बोल्ड डिझाईन बघताच क्षणी नजरेत भरणारी आहे. जर तुम्ही XL6 चे CNG व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारचे फीचर्सची आणि किंमत जाणून घेऊयात…

किती असेल मायलेज

XL6 CNG मॉडेलमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर K15C सॉफ्ट-हायब्रिड ड्युअलजेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर XL6, 26.32Km/Kg मायलेज देते.

प्राईज आणि फीचर्स

XL6 CNG फक्त Zeta प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे असून तीची एक्स-शोरूम किंमत 12.24 लाख आहे. तुम्ही मासिक हप्त्यावर देखील XL6 CNG कार खरेदी करू शकता. यासाठी मासिक सदस्यता शुल्क 30,821 रुपयांपासून सुरू होते.

सेफ्टी फीचर्स

XL6 ही CNG व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च होणारी पहिली प्रीमियम MPV बनली आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, एअर बॅग्ज, डिस्क ब्रेक यांसारखे फिचर्स पाहायला मिळतात. या कारची विक्री Nexa डीलरशिपकडून केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.