केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारं नवं वर्ष खूपच चांगलं ठरणार आहे. अनेक मोठे – मोठे गिफ्ट त्यांची वाट पाहत आहेत. 2023 पासून त्यांच्या पगारात वाढ करण्याची तयारी सुरू होणार आहे. पण, त्यांना कोणत्याही प्लांनिंगशिवाय मिळणारी एक भेट म्हणजे महागाई भत्ता.

तो दरवर्षी मिळतो अन् भविष्यातही मिळत राहणार आहे. परंतु, साल 2024 आल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. यामागे एक कारण आहे. सरकारने 2016 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती की, जर महागाई भत्ता 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाला तर तो कर्मचार्‍यांसाठी शून्य केला जाईल आणि 50% डीएची रक्कम मूळ पगारात जोडली जाईल. या नियमामुळे कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार ? आणि त्याची गणना कशी होणार ? हे समजून घेऊ..

जानेवारीत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार..

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आता पुढील सुधारणा जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. त्याचे आकडे येऊ लागले आहेत. जुलै ते सप्टेंबर महिन्यातील महागाई भत्त्याची आकडेवारी आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटी ऑक्टोबरचा अंकही येईल. यावरून पुढील वेळीही महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते, हे स्पष्ट झालं आहे.

तज्ज्ञांच्या मते, जगभरात महागाई सातत्याने वाढत आहे. मात्र, भारतात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. गेल्या महिन्यात किरकोळ आणि घाऊक महागाईत घट झाली होती. परंतु, जागतिक चलनवाढ अजूनही खूप जास्त आहे.

त्याचा प्रभाव अजूनही असू शकतो. अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ होण्याचीच आशा आहे. आत्तापर्यंत दिसणारी आकडेवारी 4 टक्क्यांच्या वाढीकडे बोट दाखवत आहे. जानेवारीतही 4 टक्क्यांनी वाढ झाली तर महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचेल..

DA 50% झाल्यानंतर होणार विलीनीकरण..

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर सहा महिन्यांनी सुधारणा केली जाते. पण, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत त्यात एक अट घालण्यात आली आहे. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 50 टक्‍क्‍यांवर गेल्यावर तो मूळ पगारात विलीन केला जाईल, अशी अट आहे. आणि महागाई भत्ता म्हणजेच डीए शून्य केला जाईल. जेव्हा तो 50 टक्के असेल, तेव्हा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात जोडले जातील आणि सुधारित वेतन भत्त्याच्या रकमेत जोडले जाईल.

लेव्हल-3 कर्मचार्‍याचे किमान मूळ वेतन रु. 18000 आहे. समजा DA 50% पर्यंत वाढला, तर कर्मचार्‍याला भत्ता 9000 रु. आता मूळ पगारात ही 9000 रक्कम जोडल्यास कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 27000 रुपयापर्यंत पोहचेल आणि तेथून महागाई भत्ता शून्य होईल.

महागाई भत्ता कधी शून्य होतो ?

नवीन वेतनश्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो. तज्ञांच्या मते, नियमांनुसार, कर्मचार्‍यांना मिळणारा डीए 100% मूळ पगारात जोडला गेला. 2016 मध्ये सरकारने नियम बदलले. 2006 साली सहावी वेतनश्रेणी आली, त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187% भत्ता मिळत होता.

संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे 6 व्या वेतनश्रेणीचे गुणांक 1.87 होते. मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील केले गेले. मात्र, ते पोहोचवण्यासाठी तीन वर्षे लागली. सातव्या वेतन आयोगातही हेच करण्यात आलं आहे. आता 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2024 मध्ये येणार आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा ते होणे अपेक्षित आहे.

पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात काय झालं ?

2006 मध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या वेळी 1 जानेवारी 2006 पासून नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती, मात्र त्याची अधिसूचना 24 मार्च 2009 रोजी जारी करण्यात आली होती. या विलंबामुळे 2008-09, 2009-10 आणि 2010-11 मधील 3 आर्थिक वर्षांमध्ये 39 ते 42 महिन्यांची डीए थकबाकी 3 हप्त्यांमध्ये सरकारला देण्यात आली. नवीन वेतनश्रेणीही तयार करण्यात आली.

8000-13500 च्या पाचव्या वेतनश्रेणीत 8000 वर 186% डीए 14500 रुपये होता. त्यामुळे दोन्ही जोडल्यावर एकूण 22 हजार 880 पगार झाला. सहाव्या वेतनश्रेणीत त्याची समकक्ष वेतनश्रेणी 15600 -39100 अधिक 5400 ग्रेड वेतन निश्चित करण्यात आली होती.

सहाव्या वेतनश्रेणीत हे वेतन 15600-5400 अधिक 21000 होते आणि 1 जानेवारी 2009 रोजी 16% डीए 2226 जोडून एकूण 23 हजार 226 रुपये पगार निश्चित करण्यात आला. चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1986 मध्ये, पाचव्या 1996 मध्ये आणि सहाव्या 2006 मध्ये लागू झाल्या. सातव्या आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2016 मध्ये लागू झाल्या.

DA शून्य असताना पगार किती वाढतो ?

HRA मध्ये होणार ऑटोमॅटिक रिव्हिजन :-

जेव्हा महागाई भत्ता 50 टक्‍क्‍यांच्या पुढे जाईल तेव्हा घरभाडे भत्त्यात पुढील सुधारणाही होईल. यामध्ये 3% वाढ अपेक्षित आहे. सध्या कमाल दर 27% असून तो 30% करण्यात येणार आहे. सरकारी मेमोरँडमनुसार, जेव्हा डीए 50% ओलांडतो तेव्हा HRA 30%, 20% आणि 10% असेल. घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. त्यात शहरांची यादी आहे. X श्रेणीत मोडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 27% HRA, Y वर्गासाठी 18% आणि Z वर्गासाठी 9% HRA आहे. यामध्ये 3-3% सुधारणा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *