भारतात आता स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च झाल्या आहेत मुंबईस्थित iVoomi Energy ने S1 80, S1 100 आणि S1 240 लाँच करून S1 इलेक्ट्रिक स्कूटरला नव्या व्हेरियंटमध्ये लॉन्च केलं आहे. विविध गरजा पूर्ण करण्यासाठी iVoomi S1 लाइन-अप अपग्रेड केलं गेलं आहे. या स्कूटरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कमी किंमत आणि हाय रेंज. हे डिझाईनच्या दृष्टीने स्पोर्टी आहे आणि चांगल्या क्वालिटी सह येते.
त्याची किंमत 69,999 रुपयांपासून सुरू होते आणि 1.21 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. S1 इलेक्ट्रिक स्कूटर अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे 85,000 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असणार आहे.
iVoomi S1 240 इलेक्ट्रिक स्कूटर :-
iVoomi S1 240 इलेक्ट्रिक स्कूटर ही टॉप-स्पेक व्हर्जन आहे अन् या स्कुटरची रेंज 240 किमी असल्याचा दावा (IDC) ने केला आहे. या मॉडेलमध्ये 4.2 kWh क्षमतेचा ट्विन बॅटरी पॅक उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 2.5 kW ची मोटर मिळते, जी 3.3 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. हे 1.5-kWh बॅटरी पॅक वापरते, जे 80 किमीच्या IDC रेंजसह येते.
S1 80 इलेक्ट्रिक स्कूटर :-
तसेच एंट्री-लेव्हल S1 80 इलेक्ट्रिक स्कूटरला 1.5 kWh बॅटरी पॅक मिळतो, जो एका चार्जवर 80 किमी (IDC) ची रेंज देते. S1 80 ला हब-माउंटेड 2.5 kW मोटर मिळते ज्याचा दावा केलेला टॉप स्पीड 55 kmph आहे.
सर्व व्हेरियंटमध्ये इको, रायडर आणि स्पोर्ट या तीन रायडिंग मोड येतात. हे पीकॉक ब्लू, नाईट मरून आणि डस्की ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येते. मॉडेलमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि मॉनिटरिंग सिस्टमसह नवीन ‘फाइंड माय राइड’ फीचर्स देखील आहे. iVoomi Energy 1 डिसेंबर 2022 पासून त्याच्या डीलरशिप नेटवर्कवर नवीन S1 ई-स्कूटर श्रेणीची विक्री सुरू करणार आहे.