एप्रिल 2015 पासून देशभरात महामार्ग बनवण्याच्या मोठं – मोठ्या प्रकल्पाची चर्चा रंगली होती. त्याला ‘भारतमाला परियोजना’ असे नाव देण्यात आलं आहे. यामध्ये नॅशनल हायवे, इकॉनॉमिक कॉरिडॉर, बॉर्डर रोड, कोस्टल रोड असे सामान्य शब्द दिसले. ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस – वे चाही उल्लेख होता.

ऑक्टोबर 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतमाला प्रकल्पाला मंजुरी दिली. जुलै 2018 मध्ये केंद्र सरकारने असे 5 औद्योगिक कॉरिडॉर ओळखले, ज्यांना ग्रीन कॉरिडॉर करता येईल. त्यासाठी वाहतुकीच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला. आणि त्याच वेळी औद्योगिक केंद्रात बनवलेला माल उपभोग केंद्र आणि बंदरांपर्यंत नेण्याची सुविधा वाढवता येईल, असे दिसून आले.

म्हणजेच व्यवसाय करण्याची सोय वाढवता येते. या आधारावर राज्यातून निवडलेले पाच मार्ग होते जे कमीत कमी वेळात इतर राज्यांनाही जोडले जाणार होते. त्यातील फक्त 8 तासात 700 किमी अंतर गाठणारा नागपूर – मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वे, दुसरा म्हणजे सुरत -चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे, तिसरा मुंबई ते दिल्ली ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे, तर राज्यांत पुणे – अहमदनगर – औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे अन् समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा जालना – नांदेड एक्स्प्रेस..

या महामार्गांवर एकूण 3.10 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. हे एक्सप्रेसवे 2025 पर्यंत पूर्ण करण्याची शासनाने नियोजन केलं आहे. यातील पुणे – अहमदनगर – औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे चे शासन राजपञक जाहीर करण्यात आलं आहे.

यामध्ये गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता अलाईनमेंट ऑप्शन – 3 प्रमाणेच होणार असल्याचं कन्फर्म झालं आहे. यामध्ये रस्त्यात थोडेफार चेंजेस करण्यात आले आहे. त्यासाठी तुम्ही रिव्हाईज प्रपोजल फाईल पाहू शकता..

पुणे – अहमदनगर – औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे बाबतीत या आधी पुणे जिल्ह्यात गावांची ऑफिशियल यादी जिल्हाधिकार्यालया मार्फत प्रसिद्ध होऊन भूसंपादन सुरु झालं आहे. आता औरंगाबाद जिल्ह्याच्या औरंगाबाद, पैठण तालुक्यातील यादी प्रकशित करण्यात आली आहे. ती आपण खाली पाहू शकता..

राष्ट्रीय राजमार्ग संख्या :- 214.296 Km ते 268.912 Km

महाराष्ट्र – औरंगाबाद :-

1) पिरवाडी
2) हिरापूर
3) सुंदरवाडी
4) झाल्टा
5) आडगाव बि. के
6) चिंचोली
7) घरदोन

पैठण तालुका –

1) वरवंडी खुद्र
2) पारगाव
3) डोणगाव
4) बालानगर
5) कापुसवाडी
6) वडाळा
7) ववा
8) वरुडी बिके
9) पाचळगाव
10) नारायणगाव
11) करंजखेडा
12) आखदवाडा
13) वाघाडी
14) दडेगाव जहांगीर
15) पाटेगााँव
16) साईगांव
17) पैठण (MC-1)

पुणे जिल्ह्यातील ऑफिशियल गावांच्या यादीचे पत्रक पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद ग्रीनफिल्ड महामार्गाविषयी अधिक माहितीसाठी :- इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *