7th Pay Commission : ठरलं ! होळीपूर्वीच मिळणार कर्मचाऱ्यांना गुड न्यूज, 3 महिन्यांचा 42% वाढीव DA होणार खात्यात जमा..
आर्थिक वर्ष 2022 – 23 संपण्याच्या मार्गवर असून आता कंपन्यांमध्ये वेतनवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचारीही पहिल्या सहामाहीच्या डीए (DA) ची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करते, असा ट्रेंड दिसून आला आहे.
यावेळी होळी 8 मार्च रोजी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) येत्या 10 दिवसांत जाहीर केला जाऊ शकतो. 1 मार्च रोजी त्याची घोषणा होऊ शकते, असं मानलं जात आहे. 1 मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळणार असून याबाबत अर्थ मंत्रालयाकडून अपडेट मिळालं आहे.
DA मध्ये किती होणार वाढ..
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता महागाईच्या आधारे वाढवला जातो. महागाई जितकी जास्त तितका महागाई भत्ता वाढतो. यामध्ये उद्योग कामगारांची किरकोळ महागाई दिसून येते. या महागाईचा विचार करता यावेळी महागाई 4.23 टक्क्यांनी वाढली पाहिजे. पण सरकार राउंड फिगरमध्ये डीए वाढवते. अशा स्थितीत यावेळी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढू शकतो.
पगारात किती होणार वाढ..
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यानंतर तो 42 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार आता महिन्याला 18,000 रुपये असेल, तर त्याचा डीए 6,840 रुपये होईल. 4 टक्क्यांच्या वाढीनंतर हा डीए 7,560 रुपये होईल. अशा प्रकारे मूळ वेतनात 720 रुपयांची वाढ होणार आहे. डीएमधील ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.
होळीपूर्वीचं मिळणार गुड न्यूज..
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता जाहीर करते. वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा DA होळीपूर्वी अनेकदा जाहीर केला जातो. आतापर्यंतचा पॅटर्न हाच सांगतो मात्र, कोरोनाच्या काळात सरकारने डीए बंद केला होता. आता DA सोबत, सरकार पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) देखील जाहीर होणार आहे.
AICPI आकडेवारीनुसार 42% DA कंफर्म..
डिसेंबर 2022 साठी AICPI ची आकडेवारी देखील कामगार मंत्रालयाकडून आली आहे. यावरून DA आणि DR मध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे दिसत आहे. परंतु, कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या डिसेंबर 2022 मधील AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली आहे. AICPI च्या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सातत्याने वाढ झाली होती. पण डिसेंबरमध्ये AICPI च्या आकडेवारीत थोडीशी घसरण झाली आहे.
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. सप्टेंबरमध्ये ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होते. मात्र, त्यानंतरही महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता आहे.