देशातील सहकारी बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठे पाऊल उचललं आहे. RBI ने 5 सहकारी बँकांवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे, या बँकांना आता आरबीआयला पूर्वसूचना न देता कर्ज देता येणार नाहीये तर गुंतवणूकही करू शकत नाहीत, नवीन दायित्वे घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावू शकत नाहीत..

या बँकेच्या खात्यांमधून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे..

अकलूज (महाराष्ट्र) येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मर्यादा घातली आहे. बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. आरबीआयने स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, हे निर्बंध 6 महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

या बँकांचे ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत..

RBI नुसार, HCBL सहकारी बँक, लखनऊ (उत्तर प्रदेश), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि शिमशा सहकारी बँक रेग्युलर, मद्दूर, मंड्या (कर्नाटक) यांच्या सध्याच्या रोख स्थितीमुळे, या बँकेतील ग्राहकांना पैसे खंडित येणार नाही..

ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंत करता येणार दावा..

आरबीआयने म्हटले आहे की, पाच सहकारी बँकांच्या पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे.

बँकेचे कामकाज राहणार सुरु ..

RBI च्या पत्रात म्हंटल आहे की, बँकेच्या पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. आरबीआयच्या सूचनांचा मुद्दा आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला म्हणून घेऊ नये. या बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग कामकाज चालू ठेवू शकतात. यापूर्वी देशातील कमकुवत सहकारी बँकांवर कारवाई करताना आरबीआयने त्यांच्या बँकांचे परवानेही रद्द केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *