Take a fresh look at your lifestyle.

BMC चा नवा मास्टर प्लॅन..! ठाणे, नवी मुंबईहून आता फक्त 6 मिनिटांत गाठता येणार मुंबई ; पहा ‘या’ क्षेत्रांना होणार मोठा फायदा !

0

दक्षिण मुंबईतील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी बीएमसी ग्रँट रोडला ईस्टर्न फ्रीवेशी जोडणार आहे. यासाठी 5.5 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता बीएमसी बांधणार असून, त्यासाठी 663 कोटी रुपये खर्च येणार आहेत. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (प्रोजेक्ट) पी. वेलारासू म्हणाले की, MMR मधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

या उन्नत रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर ग्रँट रोड ते नवी मुंबई दरम्यान थेट वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. हा उन्नत रस्ता ग्रँट रोडला ऑरेंज गेट, ईस्टर्न फ्रीवेच्या उत्तरेकडील भागाला जोडला जाणार आहे. सुमारे 5.5 किमी लांबीच्या प्रस्तावित उन्नत रस्त्यासाठी 663 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या, ऑरेंज गेटपासून ग्रँट रोडला जाण्यासाठी सुमारे 50 मिनिटे लागतात. या बांधकामामुळे हे अंतर 6 ते 7 मिनिटांत पार करता येणार असून हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या रस्त्याच्या बांधकामामुळे ईस्टर्न फ्रीवेला जाताना पी डिमेलो रोडवरील वाहतूक कोंडी संपणार आहे. या एलिव्हेटेड कॉरिडॉरची रुंदी 5.5 मीटर ते 10.5 मीटर असणार आहे. आरसीसी पाइल, पाइल कॅप, पीअर, पीअर कॅप तयार करताना वापरण्यात येणार आहे. ते स्टील प्लेट गर्डरपासून बनवले जाणार आहे.

या क्षेत्रांना होणार फायदा..

हा ईस्टर्न फ्री – वे चेंबूर, घाटकोपरसह मुंबईच्या पूर्व उपनगरांना जोडतो, जो दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेटपर्यंत जातो. हा ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना फास्ट ट्रॅक प्रदान करतो.

ग्रँट रोड क्षेत्रापासून ईस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) पर्यंत रस्त्याने प्रवासाचे अंतर 5.56 किमी आहे, ज्याला 30 ते 50 मिनिटे लागतात. प्रस्तावित एलिव्हेटेड रोडमुळे ग्रँट रोड परिसरात येणारा नाना चौक, नेपन्सी रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरही थेट ठाण्याशी जोडला जाणार आहे.

शिवडी – वरळी लिंक रोड आणि ऑरेंज गेटपासून कोस्टल रोड परिसरातील लोकांना तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी पुरवल्या जाणार आहे. ईस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) पासून सुरू होणारा उन्नत रस्ता पुढे जे. राठोड मार्ग – हँकॉक ब्रिज – रामचंद्र भट्ट मार्ग (जे.जे. फ्लायओव्हरच्यावर) – एम.एस.अली रोड आणि शेवटी फ्रेरे ब्रिज पूर्व आणि पठ्ठे बापूराव मार्ग देना टॉकीज मार्गापर्यंत (ग्रँट रोड) पर्यंत राहणार आहे.

उन्नत रस्त्याची (Elevated Road) वैशिष्ट्ये :-

ग्रँट रोड आणि नवी मुंबई दरम्यान थेट प्रवास.

प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कॉरिडॉरची रुंदी 5.5 मीटर ते 10.5 मीटर असणार आहे.

या रोडच्या बांधकामासाठी लागणारं स्टील प्लेट गर्डरपासून बनवलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.