राज्यातील शिंदे – फडणवीस सरकरने या महिन्यातच 6 डिसेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारीव अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी व साडे सहा लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे.
आता या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे PMPML कर्मचाऱ्यांनाही आता सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. जानेवारी 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्तरीत्या बैठक घेऊन सातव्या आयोगानुसार 50% वाढीनुसार वेतन देण्याबाबत निर्णय घेणार आहेत. यानुसार महापालिकेच्या धर्तीवर डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढीव वेतनाची 50% रक्कम जमा केली जाणार आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यांच्यासंदर्भात सोमवारी पीएमपीमध्ये या मागणी वर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.
त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे भानगिरे यांनी समाजमाध्यमांशी बोलताना सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ही बैठक घेतली होती. नाना भानगिरे यांच्यासह कामगार प्रतिनिधी नरेंद्र आवारे, श्रवण तौर, उमेश पांढरे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.
पीएमपी कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे भानगिरे यांनी सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याबाबत घोषणा केली होती. त्याचसंदर्भात, ही बैठक घेण्यात आली होती. यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांनी डिसेंबर महिन्यापासूनच सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची 50% वेतनवाढ दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे PMPML कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जानेवारी महिन्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल व त्यानंतर, उर्वरित 50% रकमेचे वेतन वाटप सुरू केले जाणार आहे. सुमारे ११ हजार कर्मचान्यांना याचा लाभ होणार आहे. याबरोबरच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी जागा निश्चितीचे काम, वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे काम असेल तसेच डेपोच्या परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन या मागण्याही मान्य करण्यात आल्याचे भानगिरे यांनी यादरम्यान स्पष्ट केले.
पीएमपी कर्मचायांची सातव्या वेतन आयोगानुसार, वेतनाच्या फरकात 50% वाढ केली जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी (आज)अधिकृत आदेश काढला जाणार आहे. तर उर्वरित वेतनवाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर घेण्यात येईल. असे पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया यांनी स्पष्ट केले आहे.