केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) येणार नाही, अशी चर्चा होती. परंतु, 8 व्या वेतन आयोगाबाबत प्रकरण पुढे सरकत असल्याची चर्चा सरकारी विभागांमध्ये आहे. 2023 मध्ये 8वा वेतन आयोग नियोजित केला जाऊ शकतो. आता ही चर्चा योग्य ठरली तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

म्हणजे त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होऊ शकते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 8 व्या वेतन आयोगात मागील सर्व वेतन आयोगांच्या तुलनेत अनेक गोष्टी वेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ, फिटमेंट फॅक्टर ऐवजी, पगारवाढीचं अजून दुसरं सूत्र असू शकतं. तसेच, 10 वर्षांच्या अंतराने केला जाणारा आढावा दरवर्षी राबविण्यात येण्याबाबतही चर्चा होऊ शकते.

पगाराच्या नवीन स्केलवर करता येणार काम :-

सध्याच्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (किमान वेतन मर्यादा) 18,000 रुपये आहे. पगारासाठी फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला. यामध्ये प्रत्येक ग्रेडवर समान फिटमेंट लागू करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनीही याला विरोध केला. परंतु, विहित मर्यादेपासून विलंब झाल्यानंतर शिफारशींनुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनीही केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार निश्चित करण्यासाठी काही नवीन बाबींवर काम केलं पाहिजे, अशी कबुली दिली होती. सध्या, सुधारित मूळ वेतनाची गणना फिटमेंट फॅक्टरच्या आधारे जुन्या मूळ वेतनातून केली जाते.

फिटमेंट फॅक्टर वाढवणार किमान मूळ वेतन

7व्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सर्वात कमी पगारवाढ मिळाली आहे. शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला होता. या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. मात्र, मूळ वेतन 18000 रुपये करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवून किमान मूळ वेतन 26000 रुपये केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कामगिरीच्या आधारावर दरवर्षी पगारात वाढ केली जाईल. त्यामुळे खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहेत. तसेच, कमाल वेतन श्रेणी असलेल्या कर्मचार्‍यांचे पगार 3 वर्षांच्या अंतराने सुधारित केले जाऊ शकतात.

4th Pay Commission ने किती वाढला पगार

पगार वाढ : 27.6%
किमान वेतनस्केल : रु.750

5th Pay Commission ने किती वाढला पगार

पगारवाढ : 31%
किमान वेतन स्केल : रु. 2,550

6th Pay Commission ने किती वाढला पगार (Fitment factor)

फिटमेंट फॅक्टर : 1.86 पट
पगार वाढ: 54%
किमान वेतन स्केल :रु. 7,000

7th Pay Commission ने किती वाढला पगार (Fitment factor)

फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
पगारवाढ: 14.29%
किमान वेतन स्केल : रु. 18,000

8th Pay Commission ने किती वाढला पगार (Fitment factor)

फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट शक्य
वाढ : 44.44%
किमान वेतनमान: रु. 26000 शक्य

8th Pay Commission येणार की नाही ?

सध्या सरकारकडे 8 व्या वेतन आयोगाबाबत कोणताही प्रस्ताव नाही. यावर खुद्द अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनीही लोकसभेत उत्तर दिलं आहे. परंतु, सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पुढील वेतन आयोग 2024 मध्ये विचारात घेतला जाऊ शकतो. आठवा वेतन आयोग यायला अजून वेळ आहे. त्याची अंमलबजावणी 2026 मध्ये करायची असेल, तर वेतनवाढीच्या नव्या स्केलचा विचार करण्याची वेळ सरकारला आहे. पण, स्केल जे काही असेल ते वेतन आयोगाच्या अंतर्गतच लागू केले जाईल. यासाठी 2024 मध्ये वेतन आयोगाची स्थापनाही करता येईल. त्याचबरोबर 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुकाही होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाराज करणे सरकारला परवडणारं नाही. त्यामुळेच पुढील वेतन आयोग येणारचं नाही, असे म्हणणे घाईचं ठरू शकतं.

वेतन श्रेणी 1 ते 3 दरम्यान पगार 8000 रुपयांनी वाढणार !

8th Pay Commission : वेतन श्रेणी (Pay-grade) लेव्हल मॅट्रिक्स 1 ते 3 मधील केंद्रीय कर्मचार्‍यांच्या किमान पगारात मोठी वाढ होणार आहे. यामध्ये 44 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते आणि किमान मूळ वेतन 26,000 असू शकते. या क्रमाने, पे मॅट्रिक्स लेव्हल-18 पर्यंत पगार वाढेल. वेतन आयोग दर 8-10 वर्षांनी लागू केला जातो. अशा परिस्थितीत त्याची पुढील मुदत 2026 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *