स्पोर्ट युटिलिटी व्हीकलबद्दल (SUV) एक सामान्य समज आहे की, ते जास्त इंधन खातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक कंपन्यांनी स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या SUV व्हीकल लॉन्च केल्या आहेत. ज्या फक्त पॉवर, परफॉर्मन्स आणि स्पेसच्या बाबतीत चांगले नाहीत तर त्यांचे मायलेजही जबरदस्त आहे. आज आपण या लेखात अशाच परवडणाऱ्या SUV बद्दल जाणून घेणार आहोत, विशेष म्हणजे एका SUV स्टार्टींग प्राईस फक्त 7.53 लाख रुपये आहे. चला तर मग एक नजर टाकूया सर्वोत्कृष्ट मायलेज असलेल्या SUVs Cars वर…
Hyundai Venue :-
Hyundai ची कॉम्पॅक्ट SUV Venue पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शनसह येते, ही छोटी SUV कंपनीने कनेक्टेड कार मार्केट म्हणून लॉन्च केली होती. त्याचे पेट्रोल व्हेरियंट दोन इंजिन ऑप्शनसह येतात, एका व्हेरियंटमध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि दुसर्या व्हेरियंटमध्ये 1.0 लिटर क्षमतेचे इंजिन. तसेच 1.5 लिटर डिझेल इंजिन डिझेल ऑप्शन म्हणून उपलब्ध आहे. त्याची किंमत 7.53 लाख ते 12.72 लाख रुपये आहे.
Hyundai Venue कनेक्टेड कार Tech, Alexa आणि Google व्हॉईस असिस्टंटसाठी सपोर्ट, 8-इंच टचस्क्रीन, एअर प्युरिफायर, ऑटो AC, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि पुश-बटण स्टार्ट / स्टॉपसह येते. फीचर्सच्या लिस्टमध्ये 4-वे इलेक्ट्रिकली अँडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, सिंगल-पॅन सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंगचा समावेश आहे. सेफ्टीच्या दृष्टीने, यात 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रिव्हर्सिंग कॅमेरा आणि हिल-होल्ड असिस्ट आहेत. स्टॅंडर्ड सेफ्टी किटमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि बॅक पार्किंग सेन्सर समाविष्ट आहेत.
किंमत: 7.53 लाखांपासून 12.72 लाखांपर्यंत
मायलेज : 23.4 Kmpl
Toyota Hyryder :-
न्यू टोयोटा हायराइडरचे (Toyota Hyryder) फीचर्स म्हणजे ते माइल्ड हायब्रीड पॉवरट्रेन तसेच ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) व्हेरियंटमध्ये येते. कंपनीने या SUV ला फ्रेश आणि न्यू लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती भारताव्यतिरिक्त इतर बाजारपेठांमध्येही लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे TNGA इंजिन युज केलं आहे, जे 92hp पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन एका इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेलं आहे जे 79hp आणि 141Nm टॉर्क जनरेट करतं.
हायब्रीड सिस्टम 177.6 V लिथियम-आयन बॅटरीसह जोडलेली आहे. अर्बन क्रूझर हायडर 25Km पर्यंत दावा केलेल्या इलेक्ट्रिक-ओन्ली रेंजसह येते आणि टोयोटा दावा केला आहे की, हाइब्रिड सिस्टीम एकूण अंतराच्या 40% आणि प्युअर EV मोडमध्ये 60% अंतर कव्हर करू शकते. ही SUV देखील 27.97 kmpl पर्यंत मायलेज देते. टोयोटा अर्बन क्रूझर हायडरमध्ये (Urban Cruiser Hyryder) पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक आणि गुगल आणि सिरी कंपॅटिबिलिटीसह व्हॉइस असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत.
इतर काही फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 17-इंच अलॉय व्हील, वायरलेस चार्जर, हेड्स अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे. कंपनीने यामध्ये सेफ्टीचीही पूर्ण काळजी घेतली आहे, यात 6 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ESP, हिल-होल्ड असिस्ट, सर्व रियर पॅसेंजरसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल आहे. कंपनीने अलीकडेच या SUV ची किंमत जाहीर केली नसली तरी आतापासून तिचा व्हेटिंग पिरियड 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.
किंमत : रु. 10.48 लाख ते रु. 18.99 लाख
मायलेज : 27.97 Kmpl
Maruti Grand Vitara :
मारुती सुझुकी ग्रँड विटारा देशांतर्गत बाजारात भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली आहे. कंपनीने ही SUV हायब्रीड पॉवरट्रेनसह बाजारात आणली आहे, त्याचे फीचर्स आणि डिटेल्स समोर आलं आहेत, न्यू ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) टोयोटा आणि सुझुकीने संयुक्तपणे विकसित केली आहे. करारानुसार, दोन्ही कंपन्या त्यांचे वाहन प्लॅटफॉर्म आणि मॉडेल एकमेकांशी शेअर करतात.
या SUV ला एकूण 2 ट्रिम्समध्ये ऑफर केली जाते – प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड, जी क्रोम फिनिश फ्रंट ग्रिल गार्निशसह येते आणि इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड, ज्याला डार्क क्रोम फिनिश मिळते. या मिड साईझ SUV ला दोन पॉवरट्रेन ऑप्शन, एका व्हेरियंटमध्ये 1.5-लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह ऑफर केलं आहे. ट्रान्समिशनमध्ये इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड ट्रिमसाठी E-CVT आणि पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड अँटोमॅटिक किंवा प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड ट्रिममध्ये 5-स्पीड मॅन्युअल समाविष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, ते सेगमेंटमध्ये सर्वोत्तम मायलेज देते, त्याचे VVT पेट्रोल इंजिन 21.11 Km आणि हायब्रिड व्हेरियंट 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
किंमत : 10.45 लाख से 19.65 लाख रुपये
मायलेज : 27.97 Kmpl