केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबत चर्चा पुढे सरकत असल्याची चर्चा आहे. जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर मोठी भूमिका बजावते. सुधारित मूळ वेतनाचे कॅल्क्युलेशन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे जुन्या मूळ वेतनातून केली जाते. वेतन आयोगाच्या रिपोर्टमध्ये फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे..

आता याप्रमाणे वाढणार किमान मूळ वेतन..

7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला होता. या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. आकडेवारीवर नजर टाकली तर 7व्या वेतन आयोगात सर्वात कमी पगारवाढ देण्यात आली होती. मात्र, मूळ वेतन 18000 रुपये करण्यात आले. 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते..

8 वा वेतन आयोग येणार का ?

8 वा वेतन आयोग येणार की नाही ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत दोन वेगवेगळ्या चर्चा आहेत. सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, सरकार यापुढे पुढील वेतन आयोगाचा विचार करणार नाही. तर तज्ञांचे असे मत आहे की, असे करणे शक्य नाही. आता एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ती व्यवस्था अचानक संपवता येत नाही. दुसरे मोठे कारण म्हणजे 8 वा वेतन आयोग येण्यास अजून वेळ आहे. पुढील वेतन आयोगाची टाइमलाइन 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते. अशा स्थितीत अजून बराच वेळ आहे.

पे – मॅट्रिक्सवर किती वाढणार पगार ?

पे मॅट्रिक्स – 1 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 26,000 रुपयांपासून सुरू होऊ शकतो. या क्रमाने, पे – मॅट्रिक्स लेव्हल -18 पर्यंत वेतन वाढेल. वेतन आयोगाचा कल पाहिला तर तो दर 8 – 10 वर्षांनी लागू होतो. यावेळीही 1 जानेवारी 2026 रोजी लागू होणार असल्याचा दावा केला जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *