Take a fresh look at your lifestyle.

8 Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज..! किती मोठा असणार 8 वा वेतन आयोग, पगारात किती होणार वाढ ? पहा कॅल्क्युलेशन

0

8 व्या वेतन आयोगाबाबत देशभरातील कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. पण, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत. अजूनही अशी आशा आहे आणि चर्चाही आहे की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरकार 8 वा वेतन अयोग्य प्रत्यक्षात आणणार आहे.

म्हणजे नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो. महागाई भत्त्यासोबत पगारात तर वाढ होतच राहणार..परंतु, पगारात सुधारणा 8 व्या वेतन आयोगाच्या वेळीच होऊ शकते. मोठी गोष्ट अशी आहे की, 2024 मध्ये 8 व्या वेतन आयोगानुसार होणारी वाढ ही 6 व्या वेतन आयोगातील वाढीपेक्षा मोठी असणार आहे.

8 Pay Commission नुसार मिळणार जबरदस्त फायदे..

सूत्रांवर विश्वास ठेवला तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार ही खेळी करू शकते. परंतु, हे प्रकरण पुढे सरकत असल्याचे निश्चित आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कर्मचारी संघटना आणि अनेक संघटनांचे आंदोलनही पुढे सरकत आहे. देशव्यापी आंदोलनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावर सरकारला परिस्थिती स्पष्ट करावी लागेल, असा इशाराही युनियनने दिला आहे.

सरकारी यंत्रणेनुसार, सध्या 8 व्या वेतन आयोगावर कोणताही प्रस्ताव नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनीही याचा उल्लेख संसदेत केला आहे. परंतु, वेतन आयोगाच्या स्थापनेची वेळ अद्याप आलेली नसल्याचे सरकारी विभागातील सूत्रांचं म्हणणं आहे. त्याची अंतिम मुदत 2024 मध्ये सुरू होणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी यावर घोषणा होऊन नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

नवीन वेतन आयोग कधी होणार लागू ?

2024 च्या अखेरीस 8 वा वेतन आयोग तयार झाला तर तो पुढील दोन वर्षांत लागू करावा लागेल. याचा अर्थ 2026 पासून परिस्थिती लागू केली जाऊ शकते. असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी पगारवाढ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानुसार 8व्या वेतन आयोगात अनेक बदल होऊ शकतात. वेतन आयोगाची रचना 10 वर्षांतून एकदा बदलली जाऊ शकते.

8 Pay Commission : दरवर्षी पगारात होणार बदल ?

सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात किमान वाढ झाली आहे. वास्तविक, फिटमेंट फॅक्टरनुसार पगार वाढला होता. यामध्ये 2.57 पट ठेवण्यात आले होते. यासह मूळ वेतन 18,000 रुपये करण्यात आलं आहे. या सूत्राचा आधार म्हणून विचार केल्यास, 8 व्या वेतन आयोगातील फिटमेंट घटकाच्या कमाल श्रेणी अंतर्गत, किमान वेतन रु. 26000 असेल. यानंतर, दरवर्षी कामगिरीच्या आधारावर खालच्या स्तरावरील कर्मचार्‍यांच्या वेतनात सुधारणा करता येईल. तसेच, जास्तीत जास्त पगार असलेल्या कर्मचार्‍यांची पुनरावृत्ती 3 वर्षांच्या अंतराने ठेवली जाऊ शकते.

कधी – कधी वाढले कर्मचाऱ्यांचे पगार ?

चौथ्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचार्‍यांची पगारवाढ 27.6% झाली. यामध्ये त्यांची किमान वेतनश्रेणी रु.750 निश्चित करण्यात आली होती.

5 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली असून त्यांच्या पगारात 31% वाढ करण्यात आली त्यामुळे त्यांचे किमान वेतन थेट 2550 रुपये दरमहा वाढले.

फिटमेंट फॅक्टर 6 व्या वेतन आयोगात लागू करण्यात आला. हे त्या वेळी 1.86 पट ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी पगारवाढ मिळाली. त्याच्या किमान पगारात 54% वाढ झाली त्यामुळे मूळ पगार वाढून रु.7000 झाला.

2014 मध्ये 7 वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला. फिटमेंट फॅक्टरचा आधार म्हणून विचार करून, 2.57 पट वाढ झाली. परंतु, झालेली वाढ केवळ 14.29% होती.

8व्या वेतन आयोगात अंदाजे वाढ ?

आता 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर, जर सरकारने जुन्या स्केलवर वेतन सुधारणा ठेवली तर त्यातही फिटमेंट फॅक्टरचा आधार मानला जाईल. या आधारावर कर्मचाऱ्यांचे 3.68 पट फिटमेंट करता येते. या आधारावर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 44.44 % वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26 हजार रुपये होऊ शकते.

8 वा वेतन आयोग येणार की नाही ?

आता आठवा वेतन आयोग कधी येणार हा प्रश्न आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनीही लोकसभेत याचा स्पष्ट इन्कार केला. परंतु, सूत्रांवर विश्वास ठेवला तर, वेळ आल्यावर वेतन आयोग स्थापन केला जाईल. पण, आता सरकारला पगारवाढीच्या नव्या स्केलवर विचार करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे यासाठी मार्ग शोधले जात आहेत. 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. अशा स्थितीत सरकारला कर्मचार्‍यांचा रोष पत्करावासा वाटणार नाही. पण, पुढील वेतन आयोग येणार नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही..

Leave A Reply

Your email address will not be published.