EPFO: 7 कोटी खातेधारकांची प्रतीक्षा संपली! डेट कन्फर्म..’या’ दिवशी खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, असा चेक करा तुमचा बॅलन्स
भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्याजाची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच व्याजाचे पैसे (PF Interest Rate) तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी EPFO ला व्याजाचे पैसे जमा करावे लागणार होते परंतु, बरेच दिवस याविषयी कोणतेही अपडेट आलेलं नव्हतं. EPFO ने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की EPF सदस्यांना नोव्हेंबरपासून पैसे मिळण्यास सुरुवात होईल. मात्र, आतापर्यंत व्याज रखडलं होतं. मात्र, यामागचे कारण अद्याप EPFO ने उघडपणे सांगितलेलं नव्हतं तर, वित्त मंत्रालयाने जून 2022 मध्येच 8.1% दराने व्याज भरण्यास मान्यता दिली होती.
EPFO विश्वस्तांनीही व्यक्त केली चिंता..
EPF खातेधारकाच्या खात्यात अद्याप पैसे आले नसल्याबद्दल EPFO च्या विश्वस्तांनी चिंता व्यक्त केली आहे. ही प्रतीक्षा खूप लांबली आहे. पण, आता कामगार मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे की, EPFO 28 फेब्रुवारीपासून पैसे खात्यात वर्ग करू शकते. म्हणजे EPF व्याजाचे पैसे होळीच्या सणाच्या आधी जमा होतील असा संदाज व्यक्त केला आहे.
परंतु, ही एक लांब प्रक्रिया आहे. त्यामुळे सर्व खातेदारांच्या खात्यात व्याजाचे पैसे मिळण्यास 15 ते 20 मार्चपर्यंत वेळ लागू शकतो. ईपीएफओ 28 फेब्रुवारीपासून पैसे जमा करण्यास सुरुवात करणार आहे.
होळीपूर्वी मिळणार व्याजाचे पैसे..
गेल्या काही वर्षांपासून खातेदारांना EPF चे व्याज वेळेवर मिळत नाही. 2020-21 साठी, मार्च 2021 मध्ये PF वर 8.5% व्याजदर निश्चित करण्यात आला होता, तर व्याजाचे पैसे डिसेंबर 2021 मध्ये प्राप्त झाले होते. त्याच वेळी, गेल्या वर्षी मार्चमध्ये देखील 2021-22 साठी 8.10% व्याजदर निश्चित करण्यात आला होता. मात्र, अद्याप खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
EPF वर गेल्या पाच वर्षातील व्याजदर ?
1- वर्ष: 2021 – 2022
EPF व्याज दर : 8.10%
2- वर्ष : 2020 – 2021
EPF व्याज दर : 8.50%
3 – वर्ष : 2019 – 2020
EPF व्याज दर : 8.50%
4- वर्ष : 2018 – 2019
EPF व्याज दर : 8.65%
5 – वर्ष : 2017 – 2018
EPF व्याज दर : 8.55%
EPF काढण्यासाठी नवीन नियम काय आहे ?
सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात EPF काढण्याचे नियम बदलले आहेत. खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन नियमानुसार, आता EPF काढण्यावर TDS 30% वरून 20% करण्यात आला आहे. ज्यांचे पॅन कार्ड ईपीएफ खात्यात अपडेट केलेलं नाही अशा PF खातेधारकांना हे लागू होणार आहे.
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्याचे पॅन कार्ड EPFO च्या रेकॉर्डमध्ये नसेल, तर पैसे काढल्यावर 30% TDS भरावा लागेल, परंतु 1 एप्रिल 2023 पासून 20% TDS भरावा लागेल. जर EPF खातेदाराने 5 वर्षांच्या सर्व्हिस हिस्ट्रीच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागणार आहे.
तुमची EPF शिल्लक कशी तपासायची ?
ऑनलाइन बॅलन्स तपासण्यासाठी खाली दिलेली स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा..
स्टेप 1 – epfindia.gov.in वर EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2 – ‘Our Services’ टॅबवर क्लिक करा. यानंतर ‘For Employees’ हा ऑप्शन निवडा.
स्टेप 3 – नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला ‘Member Passbook’ वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा UAN ( (Universal Account Number) आणि पासवर्ड टाकावा लागेल.
स्टेप 4 – लॉगिन केल्यावर तुमच्या समोर एक ड्रॉप डाउन दिसेल, त्यात वेगवेगळे पीएफ खाते ऑप्शन असतील. करंट मेंबर आयडीला निवडा.
स्टेप 5 – आता तुमच्या समोर पासबुक उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचे आणि नियोक्ता दोघांचेही मासिक योगदान पाहू शकता. यासह, एकूण शिल्लक देखील दिसून येईल. व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे देखील दर्शवेल. जर EPFO ने व्याज जमा केले असेल, तर ते येथे दिसून येईल.
SMS आणि Umang App द्वारे शिल्लक तपासा :-
तुमचे व्याजाचे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या PF खात्याचे पासबुक तपासू शकता. यासाठी तुम्ही EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. किंवा 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN ENG’ संदेश देखील पाठवू शकता. 9966044425 हा देखील एक नंबर आहे ज्यावर मिस्ड कॉल पाठवून PF शिल्लक तपासली जाऊ शकते. याशिवाय Umang App द्वारेही PF खात्यात प्रवेश करता येतो.