Ahmednagar Job : अहमदनगरमध्ये भव्य रोजगार मेळावा ; 10 वी – 12 वी, ITI, Diploma पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी !
शेतीशिवार टीम : 10 जुलै 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. अहमदनगर रोजगार मेळावा अंतर्गत ही भरती राबवली जाणार असून यामध्ये 10 वी – 12 वी, ITI, Diploma पास तरुणांसाठी विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
अहमदनगर रोजगार मेळावा यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत.
पहा रिक्त पदे, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख, पदाचे नाव, पत्ता याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा…
मेळाव्याचे नाव :- पंडित दीनदयाल उपाध्याय, प्रधान मंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी रोजगार मेळावा, अहमदनगर
पदाचे नाव :- सेल्स ट्रेनी, MMV, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिशियन/फिटर, फाउंड्रीमॅन इ.
पदसंख्या :- 322+ जागा
पात्रता :- सरकारी आणि खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती :- ऑनलाईन नोंदणी
राज्य :- महाराष्ट्र
विभाग :- नाशिक
जिल्हा :- अहमदनगर
मेळाव्याचे ठिकाण :- गवर्नमेंट आईटीआई बुरुदगांव रोड, अहमदनगर
रोजगार मेळाव्याची तारीख :- 11 जुलै 2022 आहे.