Taiwanese Papaya : महिलेने पिकवली ‘तैवानी शुगर फ्री पपई; सगळीकडे चर्चा सुरु ; 2 एकरात घेणार लाखोंचं उत्पन्न ; पहा यशोगाथा…

0

शेतीशिवार टीम : 4 ऑगस्ट 2022 :- उत्तर प्रदेशातील एका महिला शेतकऱ्याची सध्या खूप चर्चा होत आहे. या महिला शेतकऱ्याने खास प्रकारची शुगर फ्री पपई पिकवली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या राधा राणीने या पपईची लागवड केली आहे. आता यातून तिची कमाई चांगली होत असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून मिळालेल्या मदतीमुळे तिचा मार्ग सुकर झाला असून ती परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. आज ती एक गट तयार करून तिने आपले यश नवीन उंचीवर पोहचवलं आहे. मात्र, हे यश मिळवणे त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं.

राधा राणीने कोरोनाच्या काळात अनेक संकटांचा सामना केला आणि संपूर्ण दिवसाचं एकदाचं जेवण बनवून स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला. तिचा नवरा मजुरीचे काम करतो. राधा राणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कामाच्या शोधात होत्या, तेव्हाच तिला ब्लॉक अधिकार्‍यांनी महिला गट तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले, ज्यावर तिने ‘रोशनी महिला ग्राम संघटना मानव बचत गटा’ची स्थापना केली. त्यांना उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाने मदत केली. या मदतीने त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित 1 एकर जमिनीवर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पपईच्या विशेष जातीची लागवड केली, ज्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

‘या’ पपईवर केली जात नाही औषध फवारणी :-

याबाबत माहिती देताना राधा राणी म्हणाल्या की, तिने शुगर फ्री तैवानी रेड लेडी पपई (Papaya) च्या बिया पुणे, महाराष्ट्रातून घेतल्या आणि प्रशिक्षणही घेतलं. यानंतर त्यांनी आपल्या 1 एकर शेतात 1100 रेड लेडी पपईची रोपे लावली. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ते तयार होतील आणि त्यावर फळेही येण्यास सुरुवात होईल.

ही पपई शुगर फ्री असून हृदय व साखरेचे रुग्ण आणि वृद्धांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची फवारणी केली जात नाही. यामुळे हे सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत…

इटावा जिल्हा अधिकारी अवनीश राय महिला गटाद्वारे चालवल्या जात असलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तेथे त्यांनी राधा राणीने लागवड केलेल्या रेड लेडी पपई पिकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी पिकाची माहिती घेतली व काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

पुण्यातून महाराष्ट्रात आणलेले शुगर फ्री रेड लेडी पपईचे पीक एकएकरमध्ये महिला गटाच्या संचालिका राधा राणी तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. झाडे सुरक्षित असून काही दिवसांत त्यावर फळेही येऊ लागतील. याचा फायदा राधा राणीला तर होईलच, शिवाय परिसरातील लोकांना पपई पिकाच्या नवीन प्रजातीची चव चाखायला मिळणार आहे.

2 एकरमध्ये 1100 रोपांची लागवड :-  

माहिती देताना रेड लेडी पपईची लागवड करणाऱ्या राधा राणी म्हणाल्या की, आम्ही 1 एकरमध्ये मध्ये 1100 रोपे लावली होती, त्यातील 400 रोपे भटक्या प्राण्यांनी नष्ट केली. आता माझे संपूर्ण कुटुंब आणि मी पिकाची काळजी घेतो. शेतात 700 रोपांची पूर्ण वाढ झाली असून काही दिवसांत त्यांना फळे येऊ लागतील.

पपई रेड लेडी 786 तैवान बियाणे https://www.indiamart.com/proddetail/papaya-red-lady-786-taiwan-seeds-13184672630.html या लिंकवरून खरेदी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.