शेतीशिवार टीम : 31 ऑगस्ट 2022 : प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की, आपलं स्वतःच चांगलं घर, चारचाकी गाडी असावी. या स्वप्नांचा पाठलाग करत सामान्य माणूस आपलं आयुष्य पणाला लावतो. मगं कुठेतरी तो त्या स्वप्नाजवळ पोहचतो. अशाच पद्धतीने 29 वर्ष आपली खाजगी कारखान्यात घातल्यानंतर एक -एक पैसा कमावून चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण या स्वप्नाला कोणाची तरी नजर लागली अन् आपण घेतलेलं चारचाकी वाहनचं चोरीला गेलं. यावेळी मनात काय होतं असेन हे ज्याचं त्याला माहित….
पण अशीच एक घटना घडली अहमदनगर शहरातील नगर MIDC त खासगी कारखान्यात काम करणारे विलास घोडके यांच्याबाबत…
अहमदनगरच्या MIDC एका खाजगी कारखान्यात 29 वर्षे काम केल्यानंतर पै -पै जमवून चार चाकी घेतली अन् ती चोरीला गेली. खूप शोधोशोध घेतली पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले पण गाडीचा काही पत्ता सापडेना. अखेर रात्रंदिवस विचार करत कारखान्याच्या निवृत्तीतून मिळालेले 15 लाख रुपये लावून एक असा शोध लावला त्यामुळे इतरांच्या गाड्या तर चोरीला जाणार नाही
या अभियंत्याने असं लॉक बनवलं ज्यामुळे ते चारचाकी / दुचाकिला फिट केल्यांनतर वाहनाचा चोरीपासून बचाव होईल. या लॉकरची प्रयोगशाळेत टेस्ट घेतली आणि त्यानंतर कारखाना उभारून त्यात या लॉकचे उत्पादन सुरू केलं. या लॉकला आज देशभरातील दिल्ली, मुंबई सह अन्य राज्यातून मागणी वाढली आहे. पुणे पोलिसांनी तर चाकीसाठी वाहनांसाठी 500 लॉक बनवण्याची ऑर्डरही दिली.
नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीत स्वतःचा ओनम टेक्नॉलॉजी निर्मित फोर स्क्यूर लॉक तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला आहे. घोडके यांचे मूळ गाव पारनेर आहे. शासकीय महाविद्यालयातून अभियंत्याचे शिक्षण त्यांनी घेतलं आहे.
कारखान्यांत दररोज तयार होतात शंभरावर लॉक :-
सर्वसामान्यांची वाहन चोरी गेल्यानंतर जशी स्थिती माझी झाली तशी अन्य कोणाची न व्हावी म्हणून एक सुरक्षित लॉक तयार करण्याची कल्पना मला सुचली. यासाठी छोटे – छोटे पार्टस गोळा केले. निवृत्तिवेतनातून मिळालेले 15 लाखांचा खर्च भागभांडवल म्हणून लावला अन् लॉक तयार करण्याचा कारखाना सुरु केला.
आता कारखान्यात दररोज शंभरहून अधिक लॉक तयार केले जातात. या लॉकचे पेटंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी अनेकांना हे लॉक दिले. विशेष म्हणजे आपल्या कारमध्ये कोणताही बदल न करता हे लॉक लावता येतं. याची किंमत ही 1500 ते 2100 रुपये एवढी आहे.
विलास घोडके, संचालक, ओनम टेक्नॉलॉजी.
Address: D 78, MIDC, Ahmednagar, Maharashtra 414111
तुम्हालाही हे लॉक हवे असेल कृपया कॉल करा :- 9850871176 / 9604200546
व्हेबसाइट्टला भेट द्या :- http://www.mydigitalcard.org/Onam-Technologies