पुण्यातील युवा शेतकऱ्याची जिल्हाभर चर्चा ; फक्त 1 एकरातून 9 महिन्यातच मिळवला तब्बल 38 लाखांचा नफा, पहा ‘या’ 2 पिकांनी केलं मालामाल !
अनेकांना शेती करायची असते. मात्र, नोकरी करत असल्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण शेती करायची इच्छा असूनही नोकरीमुळे करता येत नाही, अशी कारणे सांगतात. मात्र , अगदी पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील श्रीकांत रामदास काकडे या तरुणाने नोकरी आणि शेती यांचा अनोखा संगम साधत तरुणांनी शेतीकडे लक्ष देत काळया आईला विसरू नये, असा संदेश दिला आहे ..
बारामती तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात ऊसदरात महाराष्ट्रात नंबर एक असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जवळ असूनसुद्धा पारंपरिक ऊस पिकाला बगल देऊन निंबूतमधील उच्चशिक्षित युवा शेतकरी श्रीकांत रामदास काकडे यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्या दोन एकर शेतात सातारी जातीच्या आल्याची शेती केली.
पाच फुटी सरी काढून संपूर्ण क्षेत्र ड्रीप इरिगेशन केलं आहे. लागवड दोन्ही बेडच्या मध्ये आंतरपीक म्हणून 15 नंबर या जातीच्या पपईची लागवड केली. शेणखताचे योग्य नियोजन, वेळच्या वेळी औषधाची फवारणी, बांधणी, खुरपणीचे नियोजन योग्य केले.
पपई हे नऊ महिन्यांत चालू होणारे पीक आहे. तर, आले नऊ महिन्यांत काढणीस येते. आल्याचे एकरी उत्पादन 20 टनांपेक्षा अधिक निघाले असून चालू बाजारभाव 40 ते 45 दर मिळाला आहे.
एकरी 9 ते 10 लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले. तर, पपईचे एकरी उत्पादन 60 ते 70 टनांच्या आसपास निघाले. चालू बाजारभाव 30 ते 40 रुपये किलोच्या आसपास मिळाला. एकरी उत्पादन 28 लाखांच्या आसपास मिळाले.
आले व पपई या दोन्ही पिकांपासून एका वर्षामध्ये 37 लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले. दोन्ही पिकांना चार लाखांच्या आसपास खर्च आला. खर्च वजा जाता दोन्ही पिकांमधून 33 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला .
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेती व्यवसायातून भरमसाट पैसे मिळतात. श्रीकांत काकडे, उच्चशिक्षित युवा शेतकरी, निंबूत, ता. बारामती
सौजन्य – पुण्यनगरी