पेट्रोल डिझेलच्या दारात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे जास्तीत जास्त लोकांचा कल EV स्कुटरकडे वाढला आहे. तुम्हीही पेट्रोलच्या खर्चाला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. होय, कारण आज आपण स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला पेट्रोलच्या खर्चातुन मुक्त करतील.
तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून फक्त 50,000 च्या आत घरी आणू शकता. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, Komaki, Bounce, Avon आणि Raftaar या कंपन्यांनी उत्कृष्ट लूक आणि फीचर्स सोबत 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रेंजमधील चांगली बॅटरी रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत.
50 हजारात Bounce कंपनीच्या 4 इलेक्ट्रिक स्कूटर
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी बाउन्स (Bounce) ही भारतीय कंपनी ग्राहकांसाठी अनेक ऑप्शन देत आहे. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Bounce Infinity E1 ही 50,000 रुपयांत एक चांगला ऑप्शन आहे. तिची Ex-showroom किंमत 45,099 रुपये पासून सुरू होते.
यानंतर, दुसरा ऑप्शन Avon E Scoot आहे, जिची Ex-showroom किंमत 49,696 रुपये आहे. या स्कुटरची बॅटरी एका चार्जमध्ये 75Km मायलेज देते.
यानंतर तुमच्यासमोर तिसरा ऑप्शन आहे तो Raftaar Electrica. तिची किंमत 48,540 रुपयांपासून सुरू होते. या EV च्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर त्याची बॅटरी एका चार्जमध्ये 100Km ची रेंज देते. कंपनीची Greta Harper ZX Series-I इलेक्ट्रिक स्कूटर देखील एक उत्तम ऑप्शन आहे. जिची Ex-showroom किंमत 41,999 रुपये आहे.
Komaki देत आहे 50,000 रुपयांच्या आत 3 ऑप्शन :-
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी Komaki ने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांच्या आत बाजारात आणल्या आहेत, Komaki XGT KM इलेक्ट्रिक स्कूटरची Ex-showroom किंमत 42,500 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 85km पर्यंत रेंज देते.
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Komaki Xone इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जिची किंमत 45,000 रुपये आहे. या EV ची रेंज देखील Komaki XGT KM सारखीच आहे म्हणजेच ही EV देखील एका चार्ज मध्ये 85Km पर्यंत चालण्याचा दावा करते.
यानंतर कंपनीचा Komaki X2 Vouge देखील तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. तिची एक्स-शोरूम किंमत 47,000 रुपये आहे. सोबतच बॅटरी रेंज 85km आहे.