Aadhaar Free Update :तुम्ही तुमचे आधार कार्ड अजूनही अपडेट केलं नसेल तर ते मोफत ऑनलाइन अपडेट केले जात आहे, ते त्वरित अपडेशन करा अन्यथा काही दिवसांनी तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. वास्तविक, UIDAI ने आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ असा आहे की, भारतीयांकडे त्यांचे आधार कार्ड (ओळख पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) इत्यादी) विनामूल्य अपडेट करण्यासाठी अद्याप सुमारे 10 दिवस आहेत. तुमचेही आधार कार्ड देखील खूप जुने असेल आणि ते तयार झाल्यापासून अपडेट झाले नसेल तर हे काम लगेच करा. हे काम तुम्ही घरी बसून काही टेप्समध्ये पूर्ण करू शकता..
आधार अपडेट करणे महत्त्वाचे का आहे ?
10 वर्षे हा खूप मोठा काळ असतो, आधार नोंदणी आणि अद्यतन नियमावली, 2016 नुसार, भारतीयांनी त्यांचे POI आणि POA दस्तऐवज त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी अद्यतनित केले पाहिजेत. हा नियम 5 आणि 15 वर्षे वयाच्या ब्लू आधार कार्डवरील मुलाचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करण्यासाठी देखील लागू होतो. विशेषत:, तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख / वय, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, नातेसंबंधाची स्थिती आणि इतर तपशीलांसह तुमचे तपशील विनामूल्य ऑनलाइन अपडेट करू शकता..
तुमचे आधार असे करा अपडेट
स्टेप 1. सर्वप्रथम तुम्हाला आधार वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जावे लागेल.
स्टेप 2. आता OTP द्वारे लॉग इन करा.
स्टेप 3. यानंतर तुमची प्रोफाइल दिसेल. आता तुम्हाला बदलायची असलेली माहिती अपडेट करा.
स्टेप 4. आता पुरावा संलग्न करा आणि सबमिट करा. दस्तऐवजाचा आकार 2 MB पेक्षा कमी नसावा. फाइलचे स्वरूप JPEG, PNG किंवा PDF असावे.
कोणतेही शुल्क नसल्याने तुम्हाला कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. तुम्ही केवळ ऑनलाइन माहिती अपडेट करू शकता जेथे डेमोग्राफिक अपडेटची आवश्यकता नाही..
आधार ऑफलाइन कसे अपडेट करावे ?
तुम्ही आधार ऑफलाइन सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
आधार अपडेटची शेवटची तारीख कधी आहे ?
जर तुम्हाला तुमचा आधार मोफत अपडेट करायचा असेल तर त्यासाठी सरकारने 14 जून 2024 पर्यंत वेळ दिला आहे. यापूर्वी, सरकारने मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2023 ठेवली होती, जी जून महिन्यापर्यंत वाढवण्यात आली होती. आता तुम्ही काही काळासाठी आधार अपडेटची मोफत सेवा घेऊ शकता. अशा परिस्थितीत अजिबात उशीर करू नये.