जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धानपिकाखालील आहे. त्यानंतर ऊस आणि तूर आदींचे क्षेत्र येते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकांची लागवड करणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून बँकांमार्फत पीककर्ज वाटप केले जाते. खरीप व रब्बी हंगाम 2023-24 करिता जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने जिल्ह्यातील विविध पिकांसाठी बँकांकडून वितरित केल्या जाणाऱ्या कर्जाचा एकरी दर ठरविला आहे.
त्यानुसार कापसाला एकरी 25 हजार 300, तर धानाला 24 हजार रुपये पीककर्ज वितरित केले जात आहे. म्हणजेच कापसाला हेक्टरी 63 हजार 250, तर धानाला 60 हजार रुपये पीककर्ज दरनिश्चित केला आहे. या पीककर्ज वाटपामुळे शेतकऱ्यांना नक्कीच सोय होते.
उसाला सर्वाधिक पीककर्ज..
गोंदिया जिल्ह्यात उसाची लागवड अल्प प्रमाणात म्हणजेच मोजकेच शेतकरी करीत असले तरी ऊस (अडसाली) पिकाला एकरी 42 हजार 900 रुपये, पूर्वहंगामी उसाला 40 हजार 700 रुपये पीककर्ज मिळते. हेक्टरी हा दर एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचतो. परंतु, लागवड क्षेत्र थोड्या प्रमाणात आहे.
कांद्यासाठी हेक्टरी 52 हजार 250 रुपये विशेष म्हणजे, खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी कांद्याचे उत्पादन खरीप हंगामातच घेतले जाते. कांद्याला हेक्टरी 52 हजार 250 रुपये पीककर्ज मिळते.
फळपिकांसाठी किती मिळणार कर्ज ?
गोंदिया जिल्ह्यात फळबाग लागवडीचे क्षेत्रसुद्धा कमी आहे. संत्रा, लिंबू या फळपिकांसाठी 28 हजार रुपये एकरी म्हणजेच हेक्टरी 70 हजार रुपयांपर्यंत पीककर्ज वितरित केले जाते.
कोणत्या पिकाला किती कर्ज ( हेक्टरी ) ?
पीक हेक्टरी कर्जाची रक्कम
धान – 60 हजार रुपये
सोयाबीन – 49 हजार 500 रुपये
मका – 35 हजार 750 रुपये
तूर – 27 हजार 500 रुपये
तीळ – 22 हजार रुपये
ऊस – 40 हजार 700 रुपये