सन 2017 पासून राज्यातील 800 पेक्षा अधिक ऊसतोडणी मशीन मालकांचे अनुदान थकीत असताना या वर्षी चक्क 900 हार्वेस्टर यंत्रांना अनुदान देण्याची घोषणा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे.
तर, 54 साखर कारखान्यांना या वेळी गाळप वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले असून, राज्यातील रेडझोनमधील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ केल्याचे यानिमित्ताने समोर आल्याचा दावा त्यांनी केला. या वर्षीचा गाळप हंगाम संपल्यानंतर याबाबतची माहिती गायकवाड यांनी साखर संकुल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी इथनॉल उत्पादन वाढत असल्याचे नमूद करताना गायकवाड म्हणाले, यंदा 900 हार्वेस्टर यंत्रांना अनुदान देण्यात येणार असून, याकरता कुणालाही अर्ज करता येणार आहे.
या वर्षा राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती करण्याची वर्षिक क्षमता 226 कोटी लिटर्सवरून 224 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्या इथेनॉलचा पुरवठा झाल्यावर 21 दिवसांत साखर कारखान्यांना वेतन करत असल्याने कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.
तर, या वर्षीच्या गाळप हंगामाचा सारांश सांगताना ते म्हणाले, यंदा एकूण ऊस गाळप हे 1052.88 लाख टन इतके झाले आहे. तर, एकूण साखर उत्पादन 105.31 लाख टन झाले आहे. हे उत्पादन मोठे आहे.त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे .
या वर्षी साखर उतारा हा 10 टक्के राहिला आहे. तर, या वर्षी साखर उत्पादनात सहकारी साखर कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर, राज्यातील 10 साखर कारखान्यांनी या वेळी उच्चतम गाळप केले आहे. त्यात माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून या वेळी सर्वांत जास्त गाळप करण्यात आले आहे.
हे पण वाचा : Combine Harvester साठी मिळणार 11 लाखांपर्यंत सब्सिडी, MahaDBT पोर्टलवर असा करा ऑनलाईन अर्ज..
तर, साखर उत्पादनात सर्वांत जास्त उत्पादन हे कोल्हापूरच्या जवाहर शेतकरी साखर कारखान्याने घेतले आहे. उच्चतम उतारा हा कोल्हापूरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने या वर्षी घेतला आहे. या वर्षी सर्वांत कमी गाळप हे लातूर जिल्ह्यातील शेतकरी ससाका, किल्लारी यांनी घेतल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले आहे.
ऊस तोडणी यंत्र :- शासन निर्णय – इथे पहा
ऊस तोडणी यंत्र ऑनलाईन अर्ज A टू Z प्रोसेस :-
या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावं लागेल, किंवा आपला आधार कार्ड ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता…
लॉगिन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला तुमचं प्रोफाइल हे 100% दाखवणं गरजेचं आहे.
यानंतर तुम्हाला ”अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे. अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आणि एक शेतकरी एक अर्ज अंतर्गत आपल्याला सर्व बाबीचा अर्ज एकाच पोर्टल वरती करता येतो.
यात आपल्याला ‘’कृषी यांत्रिकीकरण’’ ही बाब निवडा या अंतर्गतच आपल्याला अर्ज करायचा आहे.
‘कृषी यांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक केल्यांनतर अर्ज तुमच्या समोर उघडेल.
यानंतर तुम्हाला ‘’मुख्य घटक’’ हा ऑप्शन दिसेल, यामध्ये ”कृषी यांत्रिकीकरण खरेदीसाठी अर्थसाहाय्य” या वर क्लिक करायचं आहे.
या नंतर ‘’तपशील निवड’’ हा ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल त्यातील ‘’ऊस तोडणी यंत्र’’ या वर क्लिक करायचं आहे.
या नंतर तुम्हाला व्हील ड्राइव्ह प्रकार निवडा हा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये ’2 डब्ल्यू डी’ हा ऑप्शन सिलेक्ट करा.
यानंतर तुम्हाला HP श्रेणी निवड हा ऑप्शन दिसेल, यामध्ये ”170 HP पेक्षा जास्त” हा ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर यंत्रसामग्री / अवजारे / उपकरणे हा एक ऑप्शन दिसेल. त्यावर निवड करा वर क्लिक करून ‘’ऊस तोडणी यंत्र’’ ही बाब निवडा.
या नंतर तुम्ही ”मशीनचा प्रकार” मध्ये ‘’ऊस तोडणी यंत्र’’ यावर क्लिक होईल.
यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ”जतन करा” यावर क्लिक करा…
अर्ज जतन करल्यानंतर तुम्हाला घटक तपशील यशस्वीरीत्या जोडला आहे. अजून घटक जोडायचा आहे का ? तर तुम्हाला ‘NO’ म्हणायचं आहे. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर 23.60 रु. पेमेंट करावं लागेल.
प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर ‘WINER’ हा मॅसेज प्राप्त होईल या नंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील अन् तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल..
टीप : शेतकरी मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक हा अर्ज करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरही जाणून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता…