गुजरात, पश्चिम बंगालमधील सुखसागर, राजस्थानमधील अल्वर व शिखर राजस्थान येथे मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे राज्याबाहेर कांद्याला मागणी नाही, त्यात निर्यात बंद आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या लाल कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. परिणामी शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. कोपरगाव मुख्य बाजार समितीत व शिरसगाव येथील बाजार समितीचे भाव 350 ते 650 रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

साधारणपणे दिवाळीच्या सुमारास लाल कांदा बाजारात येऊ लागतो. लाल कांद्याची आवक बाजार बघून समितीमध्ये कांद्याचे ठरतात; मात्र यंदाच्या वर्षी 2 ते 3 हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता 1 हजाराच्या खाली येऊन ठेपले आहेत. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 600 ते 800 रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत.

शेजारील राज्यात कांद्याची आवक वाढलेली आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने राज्यातील कांदा बाहेर जाऊ शकत नाही, तर निर्यात बंद असल्यामुळे देशाबाहेरही कांदा पाठवता येत नाही. त्यामुळे कांद्याचे प्रमुख मार्केट असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव इतक्या कमीवर आले आहेत. हीच परिस्थिती राज्यातील बऱ्याच बाजार समितींतही निर्माण झाली आहे.

आता मार्केट मध्ये नव्या लाल कांदा यायला सुरुवात झाली आहे. ही आवक वाढल्यानंतर पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

सध्या देशातली हवामानाची परिस्थिती पहिली तर, कधी अतिवृष्टी, सततचा पाऊस, तर कधी अवकाळी पावसाने यंदाचे सोयाबीन सह कापूस पीक मातीमोल झालं आहे. जरासा उरलेला कापूस सोयाबीनलाही मार्केट मध्ये म्हणावं असा दर नाहीये. जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो. त्यामुळे जगायचे तरी कसे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

ही कोंडी कधी आणि कशी फुटणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत. कोपरगाव मुख्य बाजार समितीत 280 क्विंटल कांदा आयात झाला. त्यास 300 ते 650 रुपये भाव मिळाला, तर उपबाजार समिती शिरसगाव येथे 4,400 क्विंटल कांद्यासही तोच भाव मिळाला आहे. कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च कसा मिळवायचा ? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कवडीमोल भावात व्यापारी कांदा खरेदी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

कांदा दर कोसळण्याचं नेमकं काय आहे कारण..

कांदा केंद्र शासनाने निर्यात करावा व कांद्याला व शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या द्राक्षाचा सिजन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कांदा वाहतुकीसाठी वाहने मिळत नाही. लाल कांदा साठवता येत नाही. दुबई, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होत असतो. सध्या रेल्वेद्वारे पटना, सिलिगुडी, गुवाहाटी, कोलकाता, मालदा येथे रोज 16 हजार क्विंटल कांदा जात आहे; परंतु भाव नसल्याने तेथेही कांद्याला मार्केट नाही, असे कोपरगावचे कांदा व्यापारी महेंद्र ठक्कर यांनी सांगितले.

पहा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव..

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/02/2023
कोल्हापूर क्विंटल 5156 500 1500 1000
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 12 300 1200 800
लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1685 305 760 621
लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 11075 400 1161 675
सिन्नर – नायगाव लाल क्विंटल 761 200 641 580
राहूरी -वांबोरी लाल क्विंटल 4812 100 1000 600
नेवासा -घोडेगाव लाल क्विंटल 15791 300 1000 800
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 6240 250 755 500
भुसावळ लाल क्विंटल 32 1000 1000 1000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 5 800 1200 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 462 300 1000 650

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *