Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सूचना! ‘या’ दिवशी खात्यात येणार 2000 रुपये हप्ता; पण शासनाने आणखी एक मोठं काम वाढवलं, पहा..

0

प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेचा 13 व्या हप्त्याचे वितरण 24 किंवा 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

त्यामुळे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयपीपीबी (IPPB) खात्याशी आधार कार्ड क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे. त्यासाठी पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न केले जात आहेत. प्रधानमंत्री सन्मान किसान योजनेच्या निधीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमनच्या माध्यमातून गावातच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा गाजावाजा महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ज्या लाभार्थ्यांची आयपीपीबीमध्ये (IPPB) खाती नाहीत.

अशा नवीन लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये नव्याने उघडल्यावर पुढील 48 तासांत ती आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न होऊन सक्रिय होतील. कारण राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये (IPPB) नाहीत. तर अनेक खात्यांना आधार कार्ड क्रमांक लिंक नसल्याची स्थिती आहे.

त्यामुळे गावातील पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिल्यावर तरी शेतकऱ्यांचा नवीन खाती व जुन्या खात्यांना आधार कार्ड क्रमांक लिंक होईल. या हेतूने आता ही सुविधा ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे, असे महसूल प्रशासनाकडून सोशल मीडिया, गाव – पाड्यातील व्हॉट्सअँपद्वारे जाहिरातबाजी केली जात आहे. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान योजनेचा लाभ घेता येईल.

आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाची गरज..

ही आधार सेंडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अंत्यत सोपी व सुलभ आहे. बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज नाही.

एका बाजूने महसूल विभाग सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसिद्धी करते, तर दुसरीकडे मात्र मोखाडा पोस्ट कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व पीएम किसान योजनेच्या लाभाथ्यांची यादी पोस्ट कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे ?

यासाठी आपले आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांकसोबत असणे आवश्यक असणार आहे. IPPB तर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेले नसेल त्यांचे ही खाते उघडून देण्यात येणार असून, ते खाते आधार कार्ड क्रमांकाशी 48 ते 72 तासांत जोडले जाणार आहे.

पोस्ट कार्यालयाशी संपर्क त्याचप्रमाणे गावातील लाभार्थ्यांनी पोस्ट मास्तरशी संपर्क करून IPPB मध्ये खात सुरू करावात या योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक असल्याने 27 फेब्रुवारीपूर्वी खात्यात 13 व्या हप्त्याचे वितरण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.