Take a fresh look at your lifestyle.

Ola स्कूटर खरेदी केलीये, किंवा करणार आहात ? थांबा, एकदा बॅटरी बदलण्याचा खर्च तर पहा, हैराण व्हाल..बॅटरीचं बिल झालंय व्हायरल..

0

ओला इलेक्ट्रिकने गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक टू – व्हीलर सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवलं आहे. Ola S1 आणि S1 Pro ला त्यांच्या आकर्षक डिझाईन आणि उत्तम रेंजमुळे जास्त मागणी आहे. कंपनीने 2 दिवसांसाठी 12,000 रुपयांच्या डिस्काउंटसह आणखी एक ऑफर जाहीर केली आहे. मात्र, या दरम्यान, या स्कूटरच्या बॅटरीशी संबंधित असा एक दस्तावेज समोर आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर ज्यांनी ही स्कुटर घेतली आहे त्यांना तर धक्काच बसू शकतो. ज्यांना खरेदी करायची आहे ते तर प्लॅनचं बदलू शकतात. होय, Ola S1 आणि S1 Pro च्या बॅटरीची किंमत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही किंमत एवढी जास्त आहे की, ती पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल..

बॅटरीची किंमत रु. 87,298

सोशल मीडिया यूजर तरुण पाल यांनी बॅटरीची किंमत शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, S1 आणि S1 Pro चा बॅटरी पॅक डिटेल्स लाकडी पेटीवर चिकटलेला आहे. ज्यावर बॅटरीच्या किमतीही लिहिलेल्या असतात. त्यानुसार, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरलेल्या 2.98 kWh बॅटरी पॅकची किंमत 66,549 रुपये असून Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरलेल्या 3.97 kWh बॅटरी पॅकची किंमत 87,298 रुपयापर्यंत आहे. ओलाच्या या बॅटरी पॅकच्या किंमतीमध्येचं तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर चे अनेक मॉडेल्स बाजारात मिळू शकतात.

स्कूटरवर 12 हजारांचा डिस्काउंट..

ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर दोन दिवसांसाठी (18 आणि 19 फेब्रुवारी) ऑफर आणली आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, S1 मॉडेलवर 10,000 रुपये आणि S1 Pro वर 12,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ओला केअर प्लस सेवेवर ग्राहकांना 50% अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

तसेच, विनामूल्य हायपरचार्जरचा प्रवेश एका वर्षासाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय, कमी व्याजदर, कमी ईएमआय, झिरो प्रक्रिया शुल्कासह 4000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे. झिरो डाउन पेमेंटचा ऑप्शनही ग्राहकांना मिळेल. म्हणजे 1 रुपया न भरताही तुम्ही बाईक खरेदी करू शकाल..

Ola S1 Pro रेंज आणि फीचर्स :-

Ola S1 Pro हे कंपनीच्या पोर्टफोलिओचे प्रमुख प्रॉडक्शन आहे. तुम्ही ते 12 रंगांच्या ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. ती 2 .9 सेकंदात 0-40 Km प्रतितास वेग पकडू शकते. तिचा टॉप स्पीड 116 Km प्रतितास आहे. तसेच, ती एका चार्जवर 181 Km पर्यंतची रेंज देते. यात 7-इंचाचा TFT डिस्प्ले आहे, ज्यामध्ये चार्जिंग, राइडिंगशी संबंधित अनेक डिटेल्स उपलब्ध आहेत.

या मॉडेलवरील हार्डवेअरमध्ये ट्यूबलर फ्रेम, सिंगल फ्रंट फोर्क आणि मागील मोनो – शॉक समाविष्ट आहे. अँकरिंग सेटअपमध्ये 220 मिमी फ्रंट डिस्क आणि 180 मिमी मागील रोटर समाविष्ट आहे. भारतीय बाजारपेठेत, Ola S1 Pro ची स्पर्धा Ather 450X, बजाज चेतक आणि TVS iQube शी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.