अतिवृष्टी नुकसान भरपाई : 2022 । अखेर तो GR आला, 1500 कोटींचा निधी वितरित, अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक 241 कोटी..
सन 2022 मधील सप्टेंबर – ऑक्टोबर सततच्या पावसामुळे पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख 57 हजार 971 हेक्टर बाधित क्षेत्रातील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे. ऐन पेरणीच्या वेळी ही मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय मंगळवार, 20 जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त प्राप्त प्रस्तावांबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानासाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति बुलढा हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 2,92,751 शेतकऱ्यांना सुमारे 241 कोटी, अकोला जिल्ह्यातील 1,33,656 शेतकऱ्यांना 86 कोटी 72 लाख, अमरावती जिल्ह्यातील 2,03,121 शेतकऱ्यांना 129 कोटी 57 लाख, औरंगाबाद येथील 4,01,446 शेतकऱ्यांना 226 कोटी 98 लाख, बीड जिल्ह्यातील 4,37,688 शेतकऱ्यांना 195 कोटी 3 लाख, बुलढाणा जिल्ह्यातील 2,38,323 शेतकऱ्यांना 114 कोटी 90 लाख, जळगाव जिल्ह्यातील 62,859 शेतकऱ्यांना 45 कोटी 14 लाख, जालना जिल्ह्यातील 2,14,793 शेतकऱ्यांना 134 कोटी 22 लाख..
नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 161 शेतकऱ्यांना 6 कोटी 23 लाख, नाशिक जिल्ह्यातील 1,12,743 शेतकऱ्यांना 25 कोटी 83 लाख, उस्मानाबाद येथील 2,16,013 शेतकऱ्यांना 137 कोटी 7 लाख, परभणी जिल्ह्यातील 1,88,513 शेतकऱ्यांना 70 कोटी 37 लाख, सोलापूर जिल्ह्यातील 49,168 शेतकऱ्यांना 46 कोटी 98 लाख, वाशिम जिल्ह्यातील 63 हजार 716 शेतकऱ्यांना 39 कोटी 98 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.