Pik Vima : शेतकऱ्यांनो फक्त 1 रुपयांत काढा पीक विमा, पहा पात्रता, कागदपत्रे अन् स्टेप बाय स्टेप अर्ज प्रोसेस..
राज्य शासनाकडून सर्वसामावेशक पीक विमा योजना म्हणून शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील भात, नाचणी या पिकांचा देखील या योजनेत समावेश आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक विमा पोर्टल 1 जुलै 2023 पासून सुरू झाले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकन्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना आहे. ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी ही पिके या योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. भात, नाचणी पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याच्या अनुक्रमे 1035.20 रु. व 400 रुपयांपैकी एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे .
उर्वरित शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असणार आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका आहे.
या विम्यांतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, प्रतिकूल हवामानामुळे पीक पेरणी, लावणी झाली नसल्यास हंगामातील पूर, दुष्काळामध्ये झालेले नुकसान, काढणीनंतर चक्रीवादळ, गारपीट अवेळी पाऊस झाल्यास शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळते.
तालुकानिहाय पिके अन् विमा रक्कम पाहण्यासाठी
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत केंद्र शासन पीक विमा अँप, संबंधित विमा कंपनी, संबंधित बैंक, कृषी / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे शेतकऱ्यांनी कळवल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.
शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान 7 दिवस संबंधित बँकेला विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7 / 12 चा उतारा
बैंक पासबुक
आधार कार्ड
पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन बँकेत विमा अर्ज देऊन , हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोचपावती त्याने जपून ठेवावी.
कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने शेतकरी विमा योजनेत सहभाग घेणे शक्य आहे. तसेच www.pmfby.gov.in या पोर्टलच्या मदतीने देखील सहभाग घेता येणार आहे.