Land Record : 7/12, फेरफार, 8-A, प्रॉपर्टी कार्ड सह सर्व शासकीय दाखले मिळणार थेट मोबाईलवर, पहा अशी आहे ऑनलाईन प्रोसेस..
शासकीय डिजिटल युगात बरीच कामे घरबसल्या मोबाईलवरूनच होतात. शासनाने देखील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक शासकीय दाखले ऑनलाईन स्वरूपात देण्याची सोय केली आहे. आता थेट शासकीय दाखले घरबसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मिळविता येणार आहेत.
शैक्षणिक कारणासाठी किंवा नोकरीसाठी विविध दाखल्यांची गरज भासते. तसेच अनेकदा जमिनीचा सातबारा व अन्य सर्व प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले सहजरीत्या मिळविता येतात. या ॲपचा वापर करत आपले राज्य व जिल्हा निवड करून अर्ज करता येतो उमंग मोबाईल ॲप हे केंद्र सरकारने विकसित केलेले ॲप आहे.
या ॲपद्वारे राज्याची किंवा ई – जिल्हा सेवा पयार्यावर क्लीक करताच त्या – त्या राज्य शासनाचे “पोर्टल” सुरू होतात.
7/12 उताराही काढण्यासाठी तलाठी महाराष्ट्राची निवड करताच “आपलं सरकार” हे पोर्टल सुरू होते. सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारीदेखील करता येतात. सरकारच्या ” उमंग ” नावाच्या ॲन्ड्रॉइड “डिजिलॉकर” देखील या ॲपवर मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या डिजिटल उपलब्ध आहे.
या विभागांची मिळतात कागदपत्रे :-
राज्य राजपत्र, महसूल, पोलीस क्लिअरन्स, कामगार विभाग, महाराष्ट्र जमीन रेकॉर्ड, राज्य उत्पादन शुल्क, सामान्य सेवा असे बहुपर्याय दिसतात, जे प्रमाणपत्र दाखला हवा आहे त्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
माझे रेशन हा देखील उत्तम पर्याय :-
रेशनकार्ड संबंधित माहिती मिळविण्यासाठी किंवा रास्त भाव दुकानांची माहिती मिळविण्यासाठी कुठेही कुठल्याही प्रकारेफोन करण्याची आता गरज राहिलेली नाही. उमंग ॲपद्वारे “माझे रेशन” पर्याय निवडल्यानंतर जवळच्या रास्त भाव दुकानांची यादी तसेच रेशनकार्डचा तपशीलदेखील सहज उपलब्ध होतो. .
रेशनकार्डचा क्रमांक नोंदविताच तपशील वाचावयास मिळतो. तसेच रेशनकार्डवरील मागील सहा महिन्यांच्या खरेदीचेही तपशील बघता येतात.
7/12, फेरफार, 8-A, प्रॉपर्टी कार्डसह सर्व दाखले मिळवण्यासाठी
7/12 उतारा उमंग ॲपवरही उपलब्ध..
महाभूमी संकेतस्थळावर 7/12 डिजिटल स्वाक्षरीकृत उपलब्ध होतो. या संकेतस्थळावर कुठल्याही जिल्ह्यातील रहिवाशाला 7/12 मिळविता येतो. “आपली चावडी” पर्याय निवडल्यानंतर मालमत्ता पत्रकही उपलब्ध होते.
नोंदीसंबंधी फेरफारचा प्रकार, हरकत घेण्याचा अंतिम दिनांक, फेरफार नोंदणी क्रमांक आदी माहिती गावनिहाय मिळते.
7/12 हे जमिनीच्या मालकी हक्काचे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहेत. हे दस्तऐवज आता उमंग ॲपद्वारेही डाऊनलोड करता येणार आहे. तसेच त्याची पडताळणीही या ठिकाणी शक्य होणार आहे.