Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत तुमचं नाव आहे की नाही ? असे तपासा, कार्ड बनवण्यासाठी पहा पात्रता, कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..
देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. याच उद्देशाने सरकारकडून आयुष्मान भारत योजना संपूर्ण भारतभर राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. औषधांचा खर्च, वैद्यकीय खर्च आदी सर्व खर्च सरकार करते. या योजनेतील पात्र असलेल्या लोकांसाठी आयुष्मान कार्ड बनवले गेले आहे.
यानंतर कार्डधारक पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या हॉस्पिटलमध्ये स्वत:वर मोफत उपचार घेऊ शकतो. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता की नाही यासाठी तुमची पात्रता तपासणे महत्वाचे आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता कशी तपासायची ते येथे जाणून घ्या आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही त्यासाठी नोंदणी कशी करू शकता याबाबतची सविस्तर माहितीसुद्धा या लेखात तुम्हाला मिळेल.
अशा प्रकारे आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहे की नाही ते तपासा..
सर्व प्रथम प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/ वर जाऊन. होमपेजवर ‘मी पात्र आहे का’ हा पर्याय वरच्या मेनूमध्ये दिसेल. त्याच्या आधी प्रश्नचिन्ह (?) चे चिन्ह देखील बनवले आहे, त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यावर तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. जवळ लिहिलेला कॅप्चा कोड टाकून OTP जनरेट करा.
तुमच्या मोबाईलवर येणारा OTP विहित फील्डमध्ये टाका. मोबाईल OTP सत्यापित केल्यानंतर, तुम्हाला राज्य निवडावे लागेल. तुम्ही ज्या राज्यात राहता ते राज्य निवडा.
राज्य निवडल्यानंतर, तुम्हाला श्रेणी निवडावी लागेल. ज्या श्रेणीत तुम्हाला तुमचे नाव तपासायचे आहे ती श्रेणी निवडा. काही राज्ये फक्त शिधापत्रिका क्रमांकावरून तपासण्याची सुविधा देतात, तर काही राज्ये नाव किंवा कुटुंब क्रमांकाद्वारे यादी पाहण्याची सुविधा देतात. त्याच वेळी, काही राज्यांमध्ये, मोबाइल नंबर, रेशन कार्ड आणि आपले नाव शोधण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या राज्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडा.
यानंतर, तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात की नाही. जर तुमचे नाव आयुष्मान भारत योजनेच्या यादीत समाविष्ट नसेल, तर शोध परिणाम बॉक्समध्ये कोणताही परिणाम आढळणार नाही.
याशिवाय, आणखी एक मार्ग असा आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे सर्व आवश्यक कागदपत्रे देऊन आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता तपासू शकता.
आवश्यक कागदपत्रे :-
आधार कार्ड
शिधापत्रिका
रहिवासी दाखल
मोबाईल नंबर
नोंदणी कशी कराल ?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या अटल सेवा केंद्र किंवा जनसेवा केंद्रावर जावे लागेल आणि तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स सबमिट करावे लागतील..
यानंतर त्या छायांकित प्रतींची मूळ कागदपत्रांमधून लोकसेवा केंद्राकडून पडताळणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक दिला जाईल.
नोंदणीच्या 10 ते 15 दिवसांनंतर तुम्हाला जनसेवा केंद्राकडून गोल्डन कार्ड मिळेल. त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
जर तुम्ही भूमिहीन असाल तर..
कुटुंबात एक अपंग सदस्य असेल तर.
जर तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल तर.
तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असल्यास
कच्चे घर असेल तर..
जर तुम्ही रोजंदारी कामगार म्हणून काम करत असाल तर..
निराधार, आदिवासी किंवा ट्रान्सजेंडर इ..