दर 6 महिन्यांनी महागाई भात्यात वाढ होते असं तुम्ही ऐकलंच असेल, केंद्र सरकारचे कर्मचारीही त्याची आता आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, महागाई वाढली की, कर्मचाऱ्यांच्या पगारातही प्रचंड वाढ होते. त्यासाठी महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन समजून घेणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक घटकांचा समावेश असतो. यापैकी एक फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) आहे, दुसरा मूल्यांकन (Appraisal) आहे. या दोघांच्या आधारे मूळ वेतन ठरवले जाते. कारण फिटमेंट वाढला तर पगारात आपोआप वाढ होते. त्याच वेळी, जर मूल्यांकन झालं तर वेतनात सुधारणाही होते. पण, नवीन बातमी अशी आहे की, फिटमेंट फॅक्टर आणि मूल्यांकनाशिवाय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात प्रचंड वाढ होणार आहे.
बेसिक सॅलरीत जोडला जातो महागाई भत्ता..
मूळ पगारात प्रचंड वाढ कशी होईल ? यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ या. जेव्हा सरकारने 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू केला तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणला होता. गणनेसाठी नवीन आधार वर्ष निश्चित करण्यात आले आहे. शून्य महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्वीचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनात जोडण्याचा लाभ मिळाला. आता पुन्हा एकदा असेच काहीसे घडणार आहे. महागाई भत्ता मूळ पगारात विलीन करून पुन्हा एकदा पगार वाढवण्याची योजना आहे आणि त्यानंतर महागाई भत्ता शून्य होईल..
महागाई भत्ता शून्य का होणार ?
आता प्रश्न येतो की, असे का होणार ? वास्तविक, 2016 च्या मेमोरँडममध्ये असे सांगण्यात आले आहे की, महागाई भत्ता (DA) 50% म्हणजेच मूळ पगाराच्या 50% होईल तेव्हा तो शून्यावर आणला जाईल. म्हणजे शून्य झाल्यानंतर, आता जो मिळणारा महागाई भत्ता 42 टक्के आहे तो, 1 टक्के, 2 टक्क्यांपासून परत सुरू होईल. असं यामुळे घडेल कारण, 50 टक्के महागाई भत्ता मिळताच तो मूळ पगारात विलीन केला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणेसाठी फार काळ थांबावे लागणार नाही. पूर्वी महागाई भत्ता 100 टक्क्यांपेक्षा जास्त असायचा. सहाव्या वेतनात हे सूत्र होते..
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार ?
सध्या पे – बेड लेव्हल- 1 वर मूळ वेतन 18000 रुपये आहे. हे किमान मूलभूत आहे. जर तुम्ही त्याचा हिशेब पाहिला, तर तुम्हाला एकूण 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो. पण, जर तुम्हाला 50% महागाई भत्त्याची हीच गणना दिसली, तर तुम्हाला 9000 रुपये मिळतील. आता येथे कॅच येतो. 50 टक्के डीए होताच तो शून्यावर आणला जाईल आणि मूळ वेतनात जोडला जाईल. म्हणजे 18000 रुपयांचा पगार 9000 रुपयांनी वाढून 27000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, महागाई भत्ता 27,000 रुपये मोजला जाईल. 0 झाल्यानंतर DA जर 3 टक्क्यांनी वाढला, तर त्याच्या पगारात 810 रुपये महिना वाढेल..
तर 9000 रुपये मूळ पगार कधीपर्यंत वाढणार ?
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के आहे. आता पुढील पुनरावृत्ती जुलै 2023 मध्ये होणार आहे, ज्यामध्ये 4 टक्के वाढ होऊ शकते. म्हणजेच जुलैनंतर महागाई भत्ता 46 टक्क्यांनी वाढणार आहे. अशा परिस्थितीत, जानेवारी 2024 च्या महागाई भत्त्याच्या सुधारणेवर लक्ष ठेवावे लागेल. त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली तर 49 टक्के होईल.
50% च्या बाबतीत, जानेवारी 2024 पासूनच महागाई भत्ता शून्य होईल. म्हणजे जुलै 2024 पासून, महागाई भत्ता वाढलेल्या मूळ पगारावरच मोजला जाईल. 49 टक्के राहिल्यास जुलै 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
महागाई भत्ता पुन्हा 4% वाढणार..
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात मार्चमध्ये 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. हा जानेवारी 2023 पासून लागू झाला. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार आहे. त्यातही 4 % वाढ अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मतावर विश्वास ठेवला तर, ज्या प्रकारे महागाई आहे आणि CPI-IW
चे दोन महिन्यांचे आकडे आले आहेत, तर आगामी काळात महागाई भत्ताही 4 टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. म्हणजे जुलैमध्ये महागाई भत्ता 46% होऊ शकतो.
महागाई भत्ता शून्य का होणार ?
जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा DA मूळ वेतनात जोडला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100% DA मूळ पगारात जोडला जावा, पण हे शक्य नाही. आर्थिक स्थिती आड येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आले.
त्यापूर्वी 2006 साली सहावी वेतनश्रेणी आली, त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187% भत्ता मिळत होता. संपूर्ण DA मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे 6 व्या वेतनश्रेणीचे गुणांक 1.87 होते. मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले. मात्र, ते पोहोचवण्यासाठी तीन वर्षे लागली.