पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने म्हाडा गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. म्हाडाने असाच एक उपक्रम शेलूमध्ये हाती घेतला आहे, तो म्हणजे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके टाऊनशिप..
शेलू येथील हा प्रकल्प म्हणजे चित्रपटसृष्टीतील कामगारांना घरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहेच, पण या निमित्ताने आर्थिक दुर्बल घट प्रवर्गातील नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) योजनेंतर्गत म्हाडाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
शेलू रेल्वे स्थानकापासून दोनशे मीटरवर, नेरळ स्थानकापासून फक्त पाच मिनिटांवर, वांगणी स्थानकापासून सात मिनिटांवर आणि कर्जत व बदलापूर स्थानकांपासून पंधरा मिनिटांवर अंतरावर हा प्रकल्प आहे.
माथेरान आणि कर्जत सारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या जवळच हा प्रकल्प असल्यामुळे एका निसर्गरम्य टप्प्यात नागरिकांना राहता येईल. आपल्या घराकडे सहजपणे जाता येईलच; पण जवळच्या ठिकाणांवर भटकंती करण्याचीही संधी मिळेल. बदलापूर, नेरळ, पनवेल या नजीकच्या भागातील लोकांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न म्हणजे मालमत्तेच्या वाढत्या किमती..
दादासाहेब फाळके टाऊनशिप या समस्येवर एक उत्तम तोडगा देते. या प्रकल्पातील 1 BHK फ्लॅटची किंमत अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे, ती म्हणजे फक्त 10 लाख त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकी श्रेणीतील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घर घेणे शक्य होऊ शकेल.
शिवाय, ही घरे घेण्यासाठी पेमेंट स्ट्रक्चर अशा प्रकारे डिझाईन केले आहे की, फ्लॅट्ससाठीचा EMI निवासासाठीच्या भाड्याच्या समतूल्य आहे. याचा अर्थ घरे केवळ खरेदी करणेच नव्हे तर त्यांची देखभाल करणेही परवडणारे आहे. ‘सर्वांसाठी घर’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने हा प्रकल्प म्हणजे एक पुढचे पाऊल आहे.
शिवाय, स्वस्त असली तरी या घरांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येत नाही. या प्रकल्पाची रचना भूकंप – प्रतिरोधक संरचना, अग्निशामक प्रकल्पाचे बांधकाम उच्च दर्जाचे तर होतेच, पण तो तयार होण्यास फार वेळही लागत नाही..
दादासाहेब फाळके टाऊनशिप प्रकल्प आर्थिक दुर्बल घट (EWS) प्रवर्गातील लोकांना स्वस्त दरात आपले स्वप्नातील घर मालकी हक्काने मिळण्याची मोठी संधी आहे.
मुलांच्या खेळाची जागा, लँडस्केप गार्डन, बहुउद्देशीय हॉल, बाजार आणि शैक्षणिक संस्थांसाठी राखीव क्षेत्र यांसारख्या सुविधांसह हा प्रकल्प एका वेगळ्याच लाईफस्टाईलचा, आरामदायक राहणीमानाचा अनुभव देईल.