वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरच लोकांना मुंबईहून गोव्यात जाणे सोपे होणार आहे. मुंबई ते गोवा दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची तयारी रेल्वेने केली आहे. त्यामुळे पर्यटकांना या रूटवर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.
यासंदर्भात मुंबई – गोआ रूटवर काल मंगळवारी 16 मे रोजी यशस्वी ट्रायल रन सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसने मुंबई (CSMT) ते मडगाव (गोवा) हे अंतर केवळ 6 तास 30 मिनिटांत पार केले तर, मुंबई ते रत्नागिरी हे अंतर कापण्यासाठी या एक्स्प्रेसने अवघा 4 तास 27 मिनिटांचा कालावधी घेतला. मुंबई CSMT येथून सकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी सुटलेल्या या हाय स्पीड एक्स्प्रेसने एकूण 581 किलोमीटरचे अंतर फक्त 7 तासांत यशस्वीरीत्या पूर्ण केले.
रेल्वे आधीच मुंबईतून तीन वंदे भारत ट्रेन चालवत आहे, ज्यात मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रायल रनच्या पहिल्या यशस्वी चाचणीनंतर या ट्रेनच्या आणखी 2 ते 3 ट्रायल घेण्यात येणार असून ही ट्रेन याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुळावर येईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई ते गोवा अंतर कापण्यासाठी किती लागतोय वेळ..
मुंबई (CSMT) ते मडगाव (गोवा) हे अंतर कापण्यासाठी तेजस एक्स्प्रेसला 8 तास 50 मिनिटे..
सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेसला 10 तास 41 मिनिटे..
जनशताब्दी एक्स्प्रेसला 9 तास तर मांडवी एक्स्प्रेसला 12 तासांचा कालावधी लागतो.
आता वंदे भारत एक्स्प्रेसने मात्र हेच अंतर 6 तास 30 मिनिटांमध्ये पार करणार आहे.
कोणत्या स्टेशन्सवर किती वेळात पोहचणार ?
मुंबई ते मडगाव : 6 तास 30 मिनिटांत..
मुंबई ते रत्नागिरी : 4 तास 27 मिनिटांत..
पनवेल ते रत्नागिरी : ३ तासांत..
पुरी ते हावडा वंदे भारत एक्सप्रेस सुरु..
वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई आणि गोवा दरम्यान धावण्यापूर्वी वंदे भारत ट्रेन ओडिशातील पुरी आणि बंगालमधील हावडा दरम्यान धावणार आहे. 18 मे 2023 रोजी पंतप्रधान मोदी एका आभासी कार्यक्रमात या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनचा पुरी आणि हावडा दरम्यान खुर्दा रोड, भुवनेश्वर, कटक, जाजपूर – केओंझार रोड, भद्रक, बालासोर आणि खरगपूर येथे थांबा असणार आहे.
विना इंजिन कोचशिवाय कशी धावते वंदे भारत ट्रेन..
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन 180 किमीच्या सर्वाधिक वेगाने धावू शकते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की ते कसे कार्य करते ? वास्तविक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना एकूण 16 डबे आहेत. यात पहिल्या आणि शेवटच्या डब्यांमध्ये ड्रायव्हर टेलर कोच असतात, ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोको पायलट असतात. जो ट्रेन चालवतो. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रेन आहे, ती चालवण्यासाठी लागणारी सिस्टीम आणि मोटर फक्त ट्रेनच्या 8 बोगीमध्ये बसते. यासोबतच आवश्यक असलेले सर्व ट्रान्सफॉर्मर फक्त बोगींमध्येच बसवण्यात आले आहेत, जेणेकरून वेगळ्या लोकोमोटिव्हची गरज भासणार नाही..
वंदे भारत ट्रेनची खासियत..
ट्रेनला ऑटोमॅटिक स्लिट दरवाजे बसवलेले आहेत आणि प्रत्येक फाटकाच्या बाहेर एक ऑटोमॅटिक फूट रेस्ट देखील आहे जी स्टेशनवर आल्यावर बाहेर पडते.
वंदे भारत ट्रेनच्या सीट्स प्रवाशांच्या सोयीसाठी खाली बसलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंटही देण्यात आले आहेत.
ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनाचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्याच्या आत 32-इंच टीव्ही स्क्रीन देखील आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये त्यांना फायर सेन्सर, जीपीएस आणि कॅमेराची सुविधाही मिळते.
कोणत्याही अवांछित धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी, वंदे भारत ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा कवच नावाचे सुरक्षा वैशिष्ट्य देखील स्थापित केले गेले आहे, जे दुसर्या ट्रेनशी टक्कर होण्यापासून संरक्षण करते.
वंदे भारत ट्रेन एक्स्प्रेसचा कार्यरत वेग 160 किमी प्रतितास आहे. यात इंटेलिजेंट ब्रेकिंग सिस्टीम आहे, जी कमी वेळेत ट्रेन थांबवण्यास मदत करते.
दिव्यांग प्रवाशाची पूर्ण काळजी घेत आसन क्रमांकही सीटच्या हँडलवर ब्रेल लिपीत लिहिला आहे. त्याचबरोबर दिव्यांग फ्रेंडली बायो टॉयलेटही बसवण्यात आले आहेत..