Take a fresh look at your lifestyle.

गाढवाच्या दुधाला सोन्याचा भाव ! राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात 100 रुपयांत मिळतंय 25 मिली दुध, परिसरात दुधाला मोठी मागणी..

0

भारतात पाहीजे त्या प्रमाणात गाढवाचे पालन केले जात नसले, तरी बऱ्याच देशांमध्ये गाढवांचे पालन केले जाते आणि त्याचे दूध हजारो रुपयांना विकले जाते. परदेशात गाढवाचे दूध प्रति लीटर 5 हजार रुपये दराने विकले जात असून, आता चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावखेड्यात गाढवाचे दूध 100 रुपयांमध्ये 25 मिली दिले जात आहे.

तसेही हे दूध जेव्हाच्या तेव्हा ताजे काढून दिले जात असून गाढवाच्या दुधाला सोन्याचा भाव मिळत आहे. गाढवाला प्राण्यांमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही, पण ज्या गाढवाचा उपयोग फक्त माल वाहून नेण्यासाठी केला जाते, त्याचे दूध अत्यंत फायदेशीर आणि महागडेही आहे.

गाढवाचे दूध खूप आरोग्यदायी असते आणि त्याची किंमत देखील खूप जास्त आहे. परदेशात गाढवाचे दूध प्रति लीटर 5 ते 7 हजार रुपये दराने विकले जात असल्याचे सांगितले जाते.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या काही गावखेड्यात सकाळीच गाढव हातात घेऊन व गळ्यात छोटा स्पिकर लावून गाढवाचे दूध 100 रुपयात 25 मिली दूध विकलं जात असून मोठ्या प्रमाणात सकाळ – सकाळ लोकं या दुधाचा आस्वाद घेताना दिसत आहे.

लहान मुलांना, मोठ्या युवकांना लाभदायक असून अनेक आजारांवर फायदेशीर असल्याचे लाउडस्पिकरच्या माध्यमातून सांगितले जाते. या दुधाला गावखेड्यांतील नागरिकांचीसुध्दा मागणी असल्याचे दिसून येत आहे.

गाढवाच्या दुधाचे फायदे काय ?

गाढवाचे दूध मानवी दुधासारखेच आहे. ज्यात प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण कमी आहे. परंतु लॅक्टोज जास्त असते. सौंदर्यप्रसाधने आणि औषधी उद्योगातही याचा वापर केला जातो. कारण त्यात पेशी बरे करण्याचे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्मदेखील आहेत. वैद्यकशास्त्रात असे म्हणतात की, तेथे लॅक्टोज, व्हिटॅमिन ए, बी – 1, बी – 2, बी – 6, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई देखील आहेत.

आजच्या काळात आपण खूप आधुनिक झालो आहोत. पण आपल्या निरोगी जीवनाची रहस्ये आजही इतिहासात आहेत. असे म्हटले जाते की क्लियोपेट्रा नावाची एक राणी होती जी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गाढवाच्या दुधाने स्नान करत असे. गाढवाच्या दुधाचा वापर अनेक कॉस्मेटिक किंवा सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो.

गाय किंवा म्हशीचे दूध पचत नसेल तर ते हे प्यावे ?

शतकानुशतके लहान मुलांना गाढवाचे दूध दिलं जात आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अँलर्जीपासून सुरक्षित ठेवतात. एवढेच नाही तर ज्यांना लॅक्टोज इंटॉलरेंस च्या समस्येने ग्रासले आहे आणि गाईचे किंवा म्हशीचे दूध पिऊ शकत नाही अशा लोकांसाठी गाढवाचे दूध एक उत्तम पर्याय ठरू शकते.

मधुमेहामध्ये फायदेशीर

गाढवीच्या दुधात असलेल्या प्रोटिन्समध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात जे टाइप 2 मधुमेहाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतात असे अनेक तज्ञ मानतात. हे ग्लुकोजची पातळी देखील नियंत्रित करते आणि इन्सुलिन प्रतिरोध सुधारते. परंतु याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या..

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून रक्त प्रवाह वाढवा

गाढवीच्या दुधावर प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीदरम्यान असे आढळून आले आहे की, त्याच्या प्रोटिन्समध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत ज्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या दुधाचे सेवन केल्याने शरीरात मॅक्रोफेज, नैसर्गिक किलर पेशी आणि सायटोटॉक्सिक पेशी इत्यादीसारख्या अधिक शक्तिशाली रोगप्रतिकारक पेशी बाहेर पडू लागतात.

या पेशी तुमची सूज समस्या कमी करू शकतात. याशिवाय दुधामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइडही बाहेर पडतो, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहही सुधारू लागतो. तसेच, ते रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक गोठण्यापासून रोखू शकते. एकूणच, हे एखाद्या व्यक्तीची संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी कार्य करते.

Leave A Reply

Your email address will not be published.