DA Hike: कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना होळीचं मोठं गिफ्ट..! 42% महागाई भत्ता लागू, पगारात होणार 2276 रुपयांची वाढ, पहा कॅल्क्युलेशन..
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज 1 मार्चचा दिवस खूप खास असणार आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर आज शिक्कामोर्तब करणार आहे. होळीपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट मिळणार आहे.
तुम्हीही डीए वाढीची (DA Hike) वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे. अवघे काही तास उरले आहेत. यानंतर वाढीव डीए जाहीर केला जाणार आहे. मार्च महिन्याच्या पगारात थकबाकीसह (DA arrears) खात्यावर जमा होणार आहे. मोदी मंत्रिमंडळाची आज (1 मार्च) बैठक होणार आहे. यामध्ये महागाई भत्ता मंजूर केला जाणार असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार आहे.
आज पार पडणार मंत्रिमंडळाची बैठक..
1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, राउंड फिगरमध्ये तो दिला जात असल्यामुळे त्यात 4% वाढ झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2023 पासून लागू होऊन तो 38% वरून 42% पर्यंत पोहचणार आहे.
दोन महिन्यांची मिळणार डीए थकबाकी..
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर महागाई भत्ता देण्यास सुरुवात होणार आहे. देशात 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी असून तब्बल 62 लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत. या प्रकरणात, मार्चच्या पगारासह DA आणि DR दिले जाणार आहे. वाढीव DA चा लाभ जानेवारी 2023 पासून मिळणार आहे. म्हणजे मार्चच्या पगारात वाढलेल्या महागाई भत्त्याबरोबरच दोन महिन्यांची थकबाकीही येणार आहे.
पगारात किती होणार वाढ..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पे बँडनुसार वेतन दिलं जाणार आहे. यामध्ये त्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता मोजला जातो. लेव्हल – 3 वर मूळ वेतन रु.18000 आहे. अशा परिस्थितीत DA 4 टक्क्यांनी वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. तसेच , या श्रेणीतील कमाल पगार 56900 रुपये आहे, ज्याच्या आधारावर डीएमध्ये दरमहा 2276 रुपयांची वाढ होणार आहे.
पेन्शनधारकांनाही मिळणार मोठं गिफ्ट..
होळीपूर्वी देशातील लाखो पेन्शनधारकांनाही गिफ्ट मिळणार आहेत. महागाई भत्त्यासह, महागाई सवलतीत 4% वाढ देखील मंजूर केली जाणार आहे. वास्तविक, महागाई सवलत देखील महागाई भत्त्याच्या गणनेवर आधारित असते. फरक एवढाच की कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो आणि निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनसोबतच महागाई भत्ता दिला जातो. यावेळी महागाईची सूट 38 टक्के आहे. वाढीव दराने हे देखील 42 टक्के दराने दिले जाणार आहे.