शेतीशिवार टीम :15 जुलै 2022 :- जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पेपर नॅपकिन्सच्या (Paper napkins) व्यवसायात नशीब आजमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्‍चरिंग यूनिट स्थापन करून, तुम्ही बंपर कमाई करू शकता…

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो ? तुम्ही या व्यवसायातून किती कमाई करू शकता ? याबद्दल अधिक जाणून घेउया..

आजच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर अधिक होऊ लागला आहे. सहसा हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल ते रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल अशा जवळपास सर्वत्र सर्रास वापरलं जातं.

किती करावी लागेल गुंतवणूक ?

जर तुम्हाला पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपरचे (Tissue paper) मॅन्युफॅक्‍चरिंग यूनिट उभारायचे असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता.

तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यामुळे, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.10 लाख रुपये मुदत कर्ज आणि 5.30 लाख रुपयांपर्यंतचे वर्किंग कॅपिटल लोन (Working capital loan) मिळेल.

एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. याची सुमारे 65 रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होऊ शकते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता…

कर्जासाठी मुद्रा योजनेअंतर्गत करा अर्ज :-

यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये हे डिटेल्स द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता, शिक्षण, चालू उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही प्रक्रिया शुल्क किंवा हमी शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाची रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते..

तुम्ही या व्यवसायासाठी इच्छुक असाल तर Tissue Paper Making Machine विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

Tissue Paper Making Jumbo-Roll विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *