500 ची नोट खरी की खोटी कसं ओळखाल ? हिरव्या पट्टीवरून लोकांमध्ये संभ्रम ; खरी नोट ओळखण्यासाठी RBI ने सांगितले 17 टिप्स…

0

शेतीशिवार टीम : 15 जुलै 2022 :- 500 रुपयांच्या नोटेबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, ज्या नोटांमध्ये गांधीजींजवळ हिरवी पट्टी आहे, त्या नोटा नकली असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता RBIने या बाबत महत्वाची माहिती दिली आहे.

RBI ने आता स्पष्ट केले आहे की, महात्मा गांधींच्या चित्राजवळ किंवा दूर असलेली हिरवी पट्टी ही नोट खरी आहे की नकली हे ठरवत नाही, या दोन्ही प्रकारच्या नोटा पूर्णपणे खऱ्या आणि वैध आहेत…

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) गुरुवारी सांगितले की, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, ‘500 रुपयांच्या त्या नोटा घेऊ नका, ज्यामध्ये गांधीजींच्या जवळ हिरवी पट्टी दिलेली आहे, कारण त्या 500 रुपयांच्या नोटा नकली आहेत. फक्त त्या नोटा घ्या ज्यात हिरव्या रंगाच्या पट्टीवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. अशा आशयाचा मॅसेज सोशल मीडियावर वायरल होत आहे..

हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे PIB ने म्हटले आहे. PIB ने म्हटले आहे की, 500 रुपयांची नोट नकली असल्याचा दावा मेसेजमध्ये केला जात आहे, ज्यामध्ये 500 रुपयांची नकली नोट अशी आहे, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे. हा दावा खोटा आहे. RBI म्हणण्यानुसार, दोन्ही नोटा वैध आहे.

यासोबतच PIB ने 500 रुपयांची नोट खरी आहे की नकली ? हे कसं ओळखायचं हे देखील सांगितलं. PIB ने सांगितले की, 500 रुपयांच्या नोटेवर एकूण 17 पॉइंट्स आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही ही नोट खरी आहे की खोटी हे ओळखू शकता. यापैकी 12 पॉइंट नोटेच्या वरच्या बाजूला आहेत, तर 5 पॉइंट नोटेच्या मागच्या बाजूला आहेत…

नोटेच्या पुढच्या बाजूला बनवलेले 12 मुद्दे चित्राच्या माध्यमातून प्रथम जाणून घेऊया :-

1. न जर थोड्याशा प्रकाशात पहिली तर या ठिकाणी 500 लिहिलेलं दिसेल.

2. जर तुम्ही समोरून 500 च्या नोटेखाली लपवलेली प्रतिमा पाहिली तर तुम्हाला 500 लिहिलेलं दिसेल.

3. या ठिकाणी देवनागरी लिपीत 500 लिहिलेलं दिसेल.

4. नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र असेल.

5. भारत आणि इंडिया अगदी लहान अक्षरात दिसतील.

6. हिरव्या पट्टीवर भारत आणि RBI नावं दिसेल आणि नोट तिरप्या केल्यास पट्टीचा रंग हिरव्या ऐवजी निळा दिसेल.

7. RBIकडून गॅरंटी वाचन, RBI गव्हर्नरचे चिन्ह आणि RBI चा लोगो महात्मा गांधींच्या फोटोच्या उजव्या बाजूला दिसेल.

8. रिक्त जागेत महात्मा गांधींचे चित्र आणि वॉटरमार्क दिसेल.

9. नोटाचीसंख्या दिसेल, ज्यामध्ये नंबरचा आकार डावीकडून उजवीकडे वाढलेला दिसेल.

10. 500 रुपये हिरव्या रंगात लिहिलेलं दिसेल आणि नोट तिरप्या केल्यावर त्याचा रंग हिरव्या ऐवजी निळा दिसेल.

11. अशोक स्तंभ उजव्या बाजूला असेल

12. दृष्टिहीन लोकांना नोट ओळखता यावी यासाठी काही तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत, जसे की (4) बिंदूवर महात्मा गांधींचे चित्र आणि (11) बिंदूवर अशोक स्तंभाची छपाई किंचित वाढलेली आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला 5 ओळी असतील, जे 500 च्या नोटेचे प्रतीक आहे…

नोटेच्या उलट बाजूस ओळखण्यासाठी केलेले 5 – मुद्दे

13. नोट छापण्याचे वर्ष डाव्या बाजूला लिहिलेलं असेल.

14. स्वच्छ भारताचा लोगो आणि घोषवाक्य छापलेले आहे.

15. 500 रुपयांच्या नोटेच्या मध्यभागी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले असतं.

16. नोटेच्या मध्यभागी भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याची प्रतिमा दिसेल.

17. 500 रुपये देवनागरी लिपीत लिहिलेले दिसतील.

Leave A Reply

Your email address will not be published.