पारंपरिक धान शेतीसोबतच जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. केवळ धान पिकांवर अवलंबून न राहता फळबागसारखी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची भाऊसाहेब फुडकर फळबाग योजना उपयुक्त ठरत आहे. 

कमी कालावधीत येणाऱ्या या पिकाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठीच ही योजना आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. ही योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने योजने अंतर्गत लाभ क्षेत्र मर्यादा किमान 0.20 हेक्टर ते 6.00 हेक्टर मर्यादा अनुज्ञेय राहील. भाऊसाहेब फुड़कर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे .

महाडीबीटी प्रणाली सुरु झाल्यापासून सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत.

ऑनलाइन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत पूर्वसंमती देण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

लाभार्थ्याची पात्रता..

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी.

या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

शेतकऱ्यांचा स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.

जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.

समाविष्ट पिके..

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 16 बहुवार्षिक पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. (आंबा, काजू, पेरु, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फनस, अंजिर व चिकू इत्यादी कलमे / रोपे ) शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमे / रोपांची लागवड करण्यास योजना अंमलबजावणी असेपर्यंत मान्यता आहे.

कोणत्या पिकाला किती मिळणार अनुदान..

आवश्यक कागदपत्रे

7/12 व 8-अ उतारा
हमीपत्र
संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती / अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

फळपीक योजनेसाठी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा कराल ?

सर्वप्रथम तुम्हाला राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी लागेल –

लिंक mahadbt.maharashtra.gov.in

त्यानंतर होम पेज वर तुम्हाला Login करावं लागेल.

लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे होमपेज उघडेल. या पेज वर तुम्हाला ‘शेतकरी योजना’ हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.

या मधून तुम्हाला ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा ऑप्शन’ दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.

या अर्जामधील सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरा. तसेच अर्ज भरण्यास अडथळा येत असेल तर जवळच्या CSC सेंटरवर अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *