सन 2022-23 मध्ये शासनाने स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडी करीता किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर क्षेत्र पात्र आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करता येईल.

लाभार्थ्यांनी यापूर्वी फळबाग लागवड करण्यासाठी इतर योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण, लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी लाभार्थी पात्र राहील. या योजनेअंतर्गत आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर, आंबा, पेरू, डाळींब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ व चिकु या बहुवार्षिक फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता :-

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांच या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर सात बारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सात बारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्तपणे खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्रक असणे गरजेचे आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमती पत्र आवश्यक आहे.

अर्ज व नोंदणी प्रक्रिया :-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी http:/ mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि त्याचवेळी आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असेल. या योजने अंतर्गत अनुदान हे मंजुर मापदंडाप्रमाणे देण्यात येणार असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सात बारा, आठ अ नुसार क्षेत्र, सर्वे नंबर, फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे मीटरमध्ये परिमाण अश्या प्रकारची माहिती शेतकऱ्यांनी अचूक भरणे गरजेचे आहे.

कसा मिळणार योजनेचा फायदा..

आर्थिक लक्षांकाच्या देखरेखीखाली बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जामधून संगणकीय सोडतीव्दारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासंबंधीच्या माहिती महाडीबीटी http:/ mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी आर.बी.चलवदे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

सर्वप्रथम राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जावे

त्यानंतर होम पेज वर तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login करावं लागेल.

या ठिकाणी तुमचा युजर आयडी पासवर्ड (User ID Password) टाका. त्यानंतर कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे होमपेज उघडेल. या पेज वर तुम्हाला सरकारी योजना हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.

या मधून तुम्हाला ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा ऑप्शन’ दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्जावरील संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे.

तसेच योजनेतील अटी-शर्ती मला मान्य आहे, या गोष्टीवर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे. अशाप्रकारे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत अनुदान मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *