Take a fresh look at your lifestyle.

शिवभक्तांसाठी खुशखबर ! आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा 4 तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत, अशी असणार Rope Way Line..

0

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील भीमाशंकर शहरात स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे भगवान शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते. पुणे, मुंबई आणि नाशिक सारख्या शहरांतून भीमाशंकरचे सहज जाता येते कारण राष्ट्रीय महामार्गांद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी आहे. 

तसेच, विविध शहरांतील पर्यटकांसाठी वारंवार बससेवा उपलब्ध आहे. त्यासाठी वेळ आणि पैसेही य जास्त लागतात. तुम्ही देशाच्या कोणत्या भागातून प्रवास करत आहात त्यानुसार भीमाशंकरला पोहोचण्यासाठी पुणे एक्सप्रेसवे मार्गे निसर्गरम्य ड्राइव्हची रोपवे ची संधी साधू शकता.

मुरबाडमधून भीमाशंकरच्या मंदिरात जायचे ‍असेल तर माळशेज मार्गे जुन्नर, घोडेगाववरून जावे लागते. परंतु या मार्गे श्रावण महिन्यात तर खूपच ट्राफिक असतं. तसेच  बलिवरे गावाजवळील डोंगर पायवाटेने चार तासांतच भीमाशंकरला पोहोचता येते. या मार्गावर रोपवे झाल्यास अनेक भाविकांची सोय होऊ शकेल, असा विचार करून या कल्पनेचा पाठपुरावा मुरबाडच्या माजी नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनी गेले अनेक महिने केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद रोपवे प्रत्यक्षात येऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

बलिवरे ते भीमाशंकर मार्गावर रोपवेची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी हाती लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊनही त्यांना निवेदन दिले होते.

त्यानंतरही त्याचा सतत पाठपुरावा त्यांनी सुरूच ठेवला होता. या रोपवेला मान्यता मिळाल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे मुरबाडमधील भाविक आणि ज्येष्ठ नागरिक सुखावले आहेत.

तोंडलीकर यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद…

मुरबाडमधील शिवभक्त श्रावणी सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमेस बलिवरे गावाजवळील हीच डोंगरवाट पार करून चार तासातच भीमाशंकरला पोहोचतात. ज्येष्ठ नागरिक आणि डोंगरवाटांचा सराव नसलेल्यांसाठी इथे रोपवे झाल्यास या वेगळ्या वाटेने त्यांचा मोठा वेळ वाचू शकेल, तसेच प्रवासाचा थकवाही जाणवणार नाही..

शीतल तोंडलीकर, अध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

भीमाशंकरचे अद्भुत रहस्य :-

आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले,भीमाशंकर हे पुण्यामध्ये सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे भोरगिरी गावात समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेले. भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले, हे महाराष्ट्राचे मंदिर शहर म्हणून गणले जाते. तसेच आकर्षक लँडस्केप, लोकेशन पॉईंट ज्यामध्ये रोलिंग हिल्स तसेच भीमाशंकरचे सौंदर्य वैभवशाली हिरवळ पसरलेल्या ठिकाणी ट्रेकर्स, हायकर्स, पर्वतारोहक, यात्रेकरू, फोटोग्राफर आणि सुट्टी घालवणाऱ्यांसाठी आणि या भागातील मंत्रमुग्ध करणारा भीमाशंकर ट्रेक एक आकर्षण ठिकाण म्हणून लोकं पाहतात.

मलबार जायंट स्क्वायरल्स,अद्वितीय पर्णसंभार,आणि इतर अनेक प्राण्यांच्या प्रजाती, तसेच, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य एक आकर्षक ट्रेकिंगचा अनुभव देते कारण घनदाट जंगलातून शोध घेणे खूप कठीण काम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.