7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर, पहा डिटेल्स..
भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget-2023) सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा हाच लेखाजोखा मांडणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचारीही अर्थसंकल्प सादर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, अर्थसंकल्पानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरच्या मागणीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास त्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.
अर्थसंकल्पानंतर घोषणा होण्याची शक्यता..
देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बजेटनंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते. 2022 च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती, पण ती होऊ शकली नाही. आता अर्थसंकल्पानंतर हा फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही..
पगारात होणार बंपर वाढ !
नरेंद्र मोदी सरकारचा आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी होणारा हा अर्थसंकल्प – 2023 कडे मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात विशेष घोषणा करू करण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला तर फिटमेंट फॅक्टर रिव्हाईज झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट ठरेलअन् त्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
किती वाढणार फिटमेंट फॅक्टर..
विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात फिटमेंट फॅक्टरचा महत्त्वाचा वाटा असतो. भत्त्यांव्यतिरिक्त, त्यांचे वेतन त्यांच्या मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर निश्चित केलं जातं. सध्या ते 2016 पासून 2.57 पटीने दिला जात असला तरी तो 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पगारात किती होऊ शकते वाढ ?
कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर वाढविण्याच्या मागणीचा सरकारने विचार केल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. शेवटच्या वेळी जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तेव्हा कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट 6000 रुपयांवरून थेट 18,000 रुपयांवर पोहचला. दुसरीकडे, सरकारने त्यात पुन्हा एकदा वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल..