Take a fresh look at your lifestyle.

Vande Bharat Express : देशासह महाराष्ट्रात किती वंदे भारत ट्रेन चालू आहेत ? चेक करा रूट, टाइम, स्पीड, टिकट प्राइस – Full List

0

सध्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील 8 वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहे. रेल्वे आणखी अनेक वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान धावली आणि लेटेस्ट वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन विशाखापट्टणम ते सिकंदराबाद 15 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली. वंदे भारत ही देशातील पहिली सेमी – हाय स्पीड ट्रेन कोणत्या मार्गावर धावते आणि तिचे संपूर्ण टाइमटेबल काय आहे ते जाणून घेऊया..

नवी दिल्ली – वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस :-

15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावली. ही ट्रेन सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. ट्रेन क्रमांक 22435 वाराणसीहून दुपारी 3 वाजता सुटते आणि रात्री 11 वाजता दिल्लीला पोहोचते. आणि ट्रेन क्रमांक 22436 दिल्लीहून सकाळी 6 वाजता सुटते आणि वाराणसीला दुपारी 2 वाजता पोहोचते. ही ट्रेन कानपूर आणि प्रयागराज मध्ये देखील थांबते. दिल्ली ते वाराणसी दरम्यानचा हा 759 किमीचा प्रवास ही ट्रेन 8 तासात पूर्ण करते.

नवी दिल्ली – माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस :-

दुसरी वंदे भारत एक्सप्रेस 3 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान सुरू झाली. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. ट्रेन क्रमांक 22439 दिल्लीहून सकाळी 6 वाजता सुटते आणि कटरा येथे दुपारी 2 वाजता पोहोचते. तर ट्रेन क्रमांक 22440 कटरा येथून दुपारी 3 वाजता सुटते आणि रात्री 11 वाजता दिल्लीला पोहोचते. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली ते कटरा दरम्यानचा हा 655 किमीचा प्रवास 8 तासात पूर्ण करते. ही ट्रेन अंबाला कॅंट जंक्शन, लुधियाना जंक्शन आणि जम्मू तवी येथेही थांबते.

मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस :-

तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई सेंट्रल ते गांधीनगर राजधानीपर्यंत धावते, जी 30 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.10 वाजता सुटून गांधीनगरला दुपारी 12.25 वाजता पोहोचते आणि गाडी क्रमांक 20902 गांधीनगरहून दुपारी 2.05 वाजता सुटून मुंबई सेंट्रलला रात्री 8.15 वाजता पोहोचते. मुंबई ते गांधीनगर दरम्यानचा हा 522 किमीचा प्रवास ट्रेन 6.15 मिनिटांत पूर्ण करते. ही वंदे भारत एक्सप्रेस वापी, सुरत, वडोदरा जंक्शन आणि अहमदाबाद जंक्शनवरही थांबते.

नवी दिल्ली – अम्ब अन्दौरा वंदे भारत एक्सप्रेस :-

देशातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस 13 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली ते अम्ब अन्दौरा अशी सुरू झाली. ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते, ट्रेन क्रमांक 22448 अम्ब अन्दौरा येथून सकाळी 7.30 वाजता सुटते आणि 12.55 वाजता नवी दिल्लीला पोहोचते. आणि ट्रेन क्रमांक 22447 नवी दिल्लीहून सकाळी 5.50 वाजता सुटते आणि अंब अंदौरा येथे सकाळी 11.05 वाजता पोहोचते. ट्रेन नवी दिल्ली ते अंब अंदौरा दरम्यानचा हा 412 किमीचा प्रवास 5.25 मिनिटांत पूर्ण करते. ही ट्रेन अंबाला कॅंट जंक्शन, चंदीगड जंक्शन, आनंदपूर साहिब आणि उना हिमाचल येथेही थांबते.

चेन्नई सेंट्रल – म्हैसूर जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस :-

देशातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस 11 नोव्हेंबर 2022 रोजी MGR चेन्नई सेंट्रल ते म्हैसूर जंक्शनपर्यंत सुरू झाली. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. ट्रेन क्रमांक 20607 चेन्नईपासून सकाळी 5.50 वाजता सुटते आणि 12.20 वाजता म्हैसूरला पोहोचते. तर ट्रेन क्रमांक 20608 म्हैसूरहून दुपारी 1.05 वाजता सुटते आणि चेन्नई सेंट्रलला 7.30 वाजता पोहोचते. चेन्नई ते म्हैसूर दरम्यानचा हा 496 किमीचा प्रवास ट्रेन 6.30 तासांत पूर्ण करते. या दरम्यान ही ट्रेन कटपाडी जंक्शन आणि केएसआर बेंगळुरू येथेही थांबते.

नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस :-

देशातील सहावी वंदे भारत एक्स्प्रेस 11 डिसेंबर 2022 रोजी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू झाली. ही ट्रेन शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. ट्रेन क्रमांक 20825 बिलासपूर येथून सकाळी 1.15 वाजता सुटते आणि नागपूरला 6.45 वाजता पोहोचते. तर गाडी क्रमांक 20826 नागपूरहून दुपारी 2.05 वाजता सुटते आणि बिलासपूरला 7.35 वाजता पोहोचते. ही ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यानचे 412 किमीचे अंतर 5.30 तासांत कापते. ही गाडी रायपूर जंक्शन, दुर्ग जंक्शन, राजनांदगाव आणि गोंदिया जंक्शनवरही थांबते. नागपूर ते बिलासपूर प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी एसी चेअरची किंमत रु. 1,075 आहे.

हावडा – न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस :-

देशातील सातवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 30 डिसेंबर रोजी हावडा जंक्शन ते न्यू जलपाईगुडी जंक्शन दरम्यान सुरू करण्यात आली. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते. ट्रेन क्रमांक 22301 हावडा जंक्शनवरून पहाटे 5.55 वाजता सुटते आणि दुपारी 1.25 वाजता न्यू जलपाईगुडीला पोहोचते. तर 22302 न्यू जलपाईगुडीहून दुपारी 3.05 वाजता निघून हावडा जंक्शनला रात्री 10.35 वाजता पोहोचते. हावडा ते न्यू जलपाईगुडी हे 561 किमीचे अंतर ट्रेन 7.30 तासांत कापते. ही ट्रेन बोलपूर शांतिनिकेतन, मालदा टाउन आणि बरसोई जंक्शन येथे देखील थांबते.

विशाखापट्टणम – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस :-

ही वंदे भारत एक्सप्रेस 15 जानेवारी 2023 रोजी विशाखापट्टणम ते सिकंदराबाद जंक्शन दरम्यान सुरू झाली. रविवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालते. विशाखापट्टणम ते सिकंदराबाद दरम्यानचा हा 698 किमीचा प्रवास ही ट्रेन 8.30 तासांत पूर्ण करते. ही ट्रेन राजमुंद्री, विजयवाडा जंक्शन, खम्मम आणि वारंगल येथेही थांबते.

Leave A Reply

Your email address will not be published.