जबरदस्त ऑफरोडिंग SUV लॉन्च, 6 एअरबॅग, फक्त 5 दिवसांत 5,000 हून अधिक बुकिंग; किंमत Mahindra Thar पेक्षा निम्म्याने कमी, पहा..
मारुती सुझुकी इंडियाने ऑटो एक्सपो – 2023 मध्ये आपली बहुप्रतिक्षित ऑफरोडिंग SUV मारुती Maruti Jimny सादर केली आहे. मारुती जिमनीची ही 5 – डोअर व्हर्जन जगासमोर सादर करण्यासोबतच कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केलं आहे. मारुती सुझुकी Jimny चे आता भारतीय ग्राहकही आतुरतेने वाट पाहत आहे. जिमनीला अवघ्या 5 दिवसांत 5,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत, त्यामुळे लोक ते विकत घेण्यास उत्सुक आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या SUV साठी बुकिंग रक्कम 11,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
कंपनी नेक्सा रिटेल चॅनलद्वारे हे वाहन विकणार आहे. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण त्याची किंमत 9 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Jimny ची खरी स्पर्धा महिंद्रा थारशी होणार आहे. सुरक्षेसाठी Jimny मध्ये अनेक महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले असले तरी खास बाब म्हणजे यात 6 एअरबॅग्ज देण्यात येणार आहेत. म्हणजे आता त्यात बसलेल्या सर्व लोकांना पूर्ण सुरक्षा मिळणार आहे.
इंजिन आणि पॉवर..
इंजिनबद्दल बोलायचं झालं तर, नवीन Jimny ला 1462cc, K-Series पेट्रोल इंजिन मिळेल जे 105 PS पॉवर आणि 134.2 Nm टॉर्क देईल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल / 4 स्पीड ऑटोमॅटिकसह येईल. मायलेजबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. सूत्रानुसार, कंपनी या वर्षी मार्च – एप्रिलपर्यंत महिन्यात लॉन्च करू शकते.
डायमेंशन आणि फीचर्स..
Jimny ची लांबी 3985 मिमी, रुंदी 1645 मिमी, उंची 1720 मिमी आणि व्हीलबेस 2590 मिमी आहे, तर 208 लिटरची बूट स्पेस मिळेल. या वाहनात 15 इंच टायर देण्यात आले असून यात 40 लिटरची इंधन टाकी असेल. पाच डोअरच्या Jimny ची लांबी चार मीटरपेक्षा कमी आहे आणि ती 7 कलरमध्ये उपलब्ध आहे ज्यात सिझलिंग रेड विथ ब्लूश ब्लॅक रूफ, सिझलिंग रेड, ग्रेनाइट ग्रे, नेक्सा ब्लू, ब्लूश ब्लॅक, पर्ल आर्क्टिक व्हाइट आणि फ्लॅगशिप – कायनेटिक यलो ब्लॅक रूफसह.
सेफ्टीसाठी, वाहन एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर व्ह्यू कॅमेरा, ISOFIX आणि साइड इम्पॅक्ट डोअर बीमने सुसज्ज आहे. यात 9 – इंचाची स्मार्ट प्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे AllGrip 4×4 सिस्टीमने सुसज्ज आहे.
किती असू शकतो व्हेटिंग पिरियड..
जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या ऑफरोडिंग SUV च्या डिलिव्हरीसाठी 3 महिने वाट पाहावी लागेल. मारुती सुझुकीवर आधीच इतर मॉडेल्सच्या डिलिव्हरींचा जास्त भार आहे, नुकत्याच लाँच झालेल्या मारुती ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा ही प्रमुख वाहने आहेत ज्यासाठी ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली आहे. अशा परिस्थितीत नवीन मॉडेल बाजारात आल्यानंतर व्हेटिंग पिरियड आणखी वाढणार आहे.