Take a fresh look at your lifestyle.

अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पातून मोठं गिफ्ट | पगारात होणार ‘इतकी’ वाढ ; बालसंगोपनाच्या निधीतही घसघशीत वाढ…

0

शेतीशिवार टीम, 11 मार्च 2022 : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला.

या पाच क्षेत्रांसाठी तब्बल 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तसेच यंदाच्या अर्थसंकल्पामधून 2022-23 वर्षासाठी महिला आणि बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून इतर महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.

यामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकेचा एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल एक लाख 30 हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली आहेत. त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e – शक्ती योजनेतून 1 लाख लाख 30 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

– जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे.

ग्राम बाल विकास केंद्राच्या अंतर्गत नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.