Take a fresh look at your lifestyle.

आता राज्यातील तलाठ्यांना दिलेल्या सजांमध्ये राहावं लागणार ; अन्यथा होणार ‘ही’ कडक कारवाई…

0

शेतीशिवार टीम, 11 मार्च 2022 : आपल्या गावच्या तलाठ्याला आता तलाठी कार्यालयाच्या परिसरात देण्यात आलेल्या सज्यांमध्येच राहावे लागणार आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि काल अधिवेशनामध्ये अनेक साऱ्या लक्षवेधी मांडण्यात आल्या आणि यामध्ये एका लक्षवेधीमधील महत्वाची लक्षवेधी म्हणजे तलाठ्यांची उपस्थिती…

तुम्हाला तर माहीतच आहे, महसूल विभागाच्या माध्यमातून महाभूमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या नागरिकांसाठी असणाऱ्या सर्वच्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. ज्यामध्ये पिक पेरा / पीक पाहणी / सातबारा / खत फेरफार / जुने अभिलेख / इतर सर्व काही कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले आहेत.

परंतु आपण जर पाहिलं तर, शेतकऱ्यांना इंटरनेटचे नसलेली उपलब्धता त्याच्याबद्दल नसलेला अवेरनेस किंवा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून दिलेली कागदपत्रे हीच ओरिजनल असतात अशा प्रकारचा एक समज. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पातळीवर आपण जर पाहिलं तर तलाठी कार्यालयाचे कार्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.

तलाठी कार्यालय मध्ये तलाठ्याची असणारी उपस्थिती सुद्धा शेतकऱ्यासाठी आवश्यक असलेला भाग आहे. तलाठी कार्यालय मध्ये यांची उपस्थिती नसणं अशा प्रकारच्या समस्या अन् तक्रारी वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याकडे केल्या जातात.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये काल झालेल्या कामकाजामध्ये विधानसभा सदस्य श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तलाठी कार्यालय मधील तलाठ्यांची उपस्थिती हा एक प्रश्न तारांकित करून मांडण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल राज्याचे महसूल मंत्री ग्रामीण पातळीवरील तलाठी हा ग्रामीण पातळीवरील अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असली तरी शेतकऱ्यांची काम आहे ती वेळेवरती पूर्ण व्हावेत यासाठी तलाठी अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. याच्यासाठी सर्व तलाठ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाच्या परिसरामध्ये देण्यात आलेल्या सज्जांमध्येच रहावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या.

आणि यापुढे आपल्या कार्यालयाच्या परिसरातील सज्जांमध्ये उपस्थित राहणार नाहीत त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल एक नियम बनवून जे तलाठी ज्या तलाठी कार्यालयातील परिसरात उपस्थित राहणार नाही त्यांचं येणाऱ्या काळात तलाठ्यांच्या वेतनातून त्यांचं घरभाडे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

त्यामुळे भविष्यकाळात तलाठी कार्यालयात उपस्थिती असण्याबाबतचा भेडसावणारा प्रश्न मार्गी लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी / नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.