अनेक दिवसांपासून क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या IIT कानपूरला बुधवारी मोठे यश मिळाले. सेसना विमानाच्या मदतीने आयआयटीवर (IIT) हवेत रासायनिक पावडर टाकण्यात आली अन् यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) परवानगीनंतर ही टेस्ट घेण्यात आली. प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी टेस्ट फ्लाइटची पुष्टी केली आहे.

उच्च वायू प्रदूषण आणि दुष्काळाच्या परिस्थितीत कृत्रिम पावसाने सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. आयआयटी कानपूर 2017 पासून या प्रकल्पावर काम करत आहे, परंतु अनेक वर्षांपासून हे प्रकरण डीजीसीएकडून परवानगी मिळण्यावर अडकले होते. सर्व तयारीनंतर डीजीसीएने टेस्ट फ्लाइट साठी परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने क्लाउड सीडिंगच्या चाचणीसाठी अनेक वर्षांपूर्वी परवानगी दिली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IIT च्या हवाई पट्टीवरून उडणाऱ्या सेसना विमानाने 5 हजार फूट उंचीवर असलेल्या दाट ढगांमध्ये दाणेदार रासायनिक पावडर उडवली. हे सर्व आयआयटी च्या वरतीच झाले.

यानंतर काही वेळातच पाऊस झाला. क्लाउड सीडिंगसाठी प्रमाणन नियामक एजन्सी केवळ डीजीसीएनेच दिली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या यशस्वी चाचणी उड्डाणाच्या निकालांचे मूल्यांकन केल्यानंतर, पुढील चाचण्या घ्यायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. यादरम्यान आयआयटी आणि परिसरात जोरदार पाऊस झाला.

दिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमध्ये धुक्याच्या वातावरणात क्लाउड सीडिंग खूप उपयुक्त ठरू शकते. आयआयटी कानपूरने दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रकल्पही तयार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *