MPSC गट- ब पोलिस उपनिरीक्षक – मुख्य परीक्षा पेपर 2 2019 प्रश्न परीक्षा पेपर 1 – 2019

1) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे.
पर्याय –
1) 35.14%
2) 45.23%
3) 50.68%
4) 60.32%

2) लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
पर्याय –
1)03
2)04
3)05
4)06

3) खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरण बांधले आहेत?
पर्याय –
1) तापी
2) मांजरा
3) पूर्णा
4) गिरणा

4) ओझरखेड ,पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
पर्याय –
1) सांगली
2) सातारा
3) पुणे
4) नाशिक

5) महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे ?
पर्याय –
1) चिखलदरा
2) मालेगाव
3) कळसुबाई
4) साक्री

6) भारतातील राष्ट्रीय सभेच्या इ.स 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
पर्याय –
1) बॅ. बुद्रुद्दीन तय्यबजी
2) डॉ. ऍनी बेझेंट
3) गोपाळ कृष्ण गोखले
4) उमेशचंद्र बॅनर्जी

7)…. हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते.
पर्याय –
1) म. गो.रानडे
2) गो. ग. आगरकर
3) जी. व्ही. जोशी
4) एस. एच.साठे

8) 1890 मध्ये….हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले.
पर्याय –
1) महादेव गोविंद रानडे
2) गणेश वासुदेव जोशी
3) विश्वनाथ नारायण मंडलिक
4) गोपाळ कृष्ण गोखले

9) कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांना….. मदत केली?
पर्याय –
1)’ हरिजन बंधूं ‘च्या प्रकाशनासाठी
2)’स्वराज्या’ च्या प्रकाशनसाठी
3) ‘मूकनायकां’ च्या प्रकाशनसाठी
4) ‘बहिष्कृत भारत’ च्या प्रकाशनसाठी

10) नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, वेस्टन इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात……यांनी केली?
पर्याय –
1) रा. गो. भांडारकर
2) गो. कृ. गोखले
3) गो. ग. आगरकर
4) म. गो. रानडे

11) भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
पर्याय –
1) म. गो. रानडे
2) मो. क. गांधी
3) बेहरमजी मलबारी
4) बा. गं. टिळक

12) लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये …..ची स्थापना केली?
पर्याय –
1) प्रभाकर
2) डेक्कन एज्युकेशन सोसायटी
3) फर्ग्युसन कॉलेज
4) होमरूल लीग

13) ‘द हाय कास्ट हिंदू वुमन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
पर्याय –
1) लेडी फॉकलंड
2) पंडिता रमाबाई
3) रमाबाई आंबेडकर
4) लेडी विलिंग्टन

14) राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?
पर्याय –
1) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
2) राज्यपाल
3) राज्याचे मंत्रिमंडळ
4) राज्याची महाधिवक्ता

15) भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेददानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पूर्ण विचार करण्याचा अधिकार आहे ?
पर्याय –
1) अनुच्छेद 137
2) अनुच्छेद 143
3) अनुच्छेद 136
4) अनुच्छेद 138

16) शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या वर्षी देण्यात आला?
पर्याय –
1)2002
2)2005
3)2009
4)2010

17) मानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018 साली कोणाला “अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्कारा” ने सन्मानित करण्यात आले ?
पर्याय –
1) अंबिका पटेल-लुईस
2) मीनल पटेल-डेविस
3) कामिनी पटेल-लुईस
4) एलई डी’ मेलो

18) ‘एमनेस्टी इंटरनॅशनल” ची स्थापना कोणी केली ?
पर्याय –
1) पीटर जॉन्सन यांनी सन 1961 मध्ये
2) पीटर बेनेन्सन यांनी सन 1961 मध्ये
3) लार्सन एम नेस्ट यांनी सन 61 मध्ये
4) उपरोक्त पैकी कोणीही नाही

19) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 दिनांक….. रोजी अंमलात आला.
पर्याय –
1) 17 सप्टेंबर 1989
2) 30 जानेवारी 1990
3) 29 नोव्हेंबर 1990
4) 12 सप्टेंबर 1989

20) एखाद्या व्यक्तीचा ठाव – ठिकाणा कळला नसेल तर ती व्यक्ती हयात नाही असे कधी गृहीत धरलं जातं ? .

पर्याय –

1) 12 वर्षे
2) 10 वर्षे
3) 7 वर्षे
4) 3 वर्षे

उत्तरे :-

1 – 2
2 – 2
3 – 3
4 – 4
5 – 4
6 – 1
7 – 1
8 – 4
9 – 3
10 – 4
11 – 1
12 – 4
13 – 2
14 – 2
15 – 1
16 – 1
17 – 2
18 – 2
19 – 2
20 – 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *