पुणे रिंग रोडबाबत मोठं अपडेट ! शेतकऱ्यांमध्ये नाराजी, रेडी रेकनरच्या 5 पट भाव ठरला पण खात्यात जमा होणार फक्त 2.5 पट, पहा डिटेल्स
पुणे जिल्ह्यातील जमीनदार, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या रिंगरोडच्या (Pune Ring Road Project) कामांनी गती घेतली असून, रिंगरोडमध्ये क्षेत्र जाणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने रिंगरोडची खरेदीखते सुरू केली असून, खरेदीखताप्रमाणे मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
परंतु मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या रिंग रोड संदर्भात स्थानिक शेतकरी हे नाराजी व्यक्त करत आहेत. या रिंग रोडसाठी शेतकऱ्यांना आपल्या जागेच्या मोबदल्यात पाचपट भाव देणारे आता अडीच पटावर आले आहेत. मुळशीमधील कासार आंबोली गावातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रिंग रोडमुळे जागा संपादित करताना रेडिरेकनरचा पाचपट दर देणार असे अधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आले, परंतु आता मात्र 2.5. पट भाव देणार, त्यात कुणी याच्या विरोधात गेले तर एकपट कमी होणार म्हणजे एकूण 3.5 पट दर कमी होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असे जाहीरपणे दिसत आहे.
शेतकरी वर्गाने न्याय कुणाकडे मागावा? अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, याला वाचा फोडणार कोण? ज्या वेळी रोडचे सर्वेक्षण झाले, त्यावेळी या भागात रहिवासी झोन आहे. अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही का ?
सदर जागेचा दर जास्त प्रमाणात आहे, याबाबत नोंद केली नाही का ? शेवटी विकास होताना शेतकरी वर्गाचा बळी दिला जाणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तर वास्तविकता या रस्त्यामुळे स्थानिक लोकांचे नुकसान होणार आहे. कारण रस्त्याला कुठेही प्रवेश मिळणार नाही, मग रस्ता झाल्यानंतरही रस्त्यालगत शेतकऱ्यांना ही प्रवेश मिळणार नाही, मग फायदा होणार कसा ?
तसेच वास्तविक पाहता कासार आंबोलीमधील शेतकऱ्यांच्या जागेचा भाव 5 ते 7 लाख रुपये आहे. याच्या पाच पट म्हणजे साधरण 25 ते 35 लाख रुपये गुंठा दर येथील शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. रहिवाशी विभागात जागा आहे, या भागात बांधकाम व्यावसायिकांनी जागा जॉइंट वेंचरमध्ये घेतली तर त्या बिल्डरकडून साधारण गुंठ्याला 700 फूट बांधकाम असलेला फ्लॅट म्हणजे अंदाजे रक्कम 21 लक्ष रुपये होती.
मात्र रिंग रोड कमिटीकडून शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडताना दिसत आहे, असे मत शिवसेना तालुका संघटक अमित कुडले यांनी मांडले आहे. तरी मुळशी तालुक्यातील संपुर्ण शेतकरी कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून जमिनीवर योग्य तो भाव मिळाला पाहिजे. अन्यथा, आत्महत्या करण्याचा मानस शेतकरी व्यक्त करत आहेत.
प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती . .
या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 17 हजार कोटींच्या घरात जाणार असून त्यासाठी पुणे शहराच्या चहुबाजुच्या खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यांतून जाणार हा रस्ता तालुक्यातील 83 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. या 5 तालुक्यातील अंदाजे 836 हेक्टर जमिन अधिगृहित करावी लागणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. चोवीस महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.170 किमी लांबीचा पुणे रिंगरोड हा आठ लेनचा असणार आहे. त्याचा वेग ताशी वेग 120 किमी असणार आहे.
या गावांतून जाणार रिंगरोड प्रोजेक्ट, पहा तालुकानिहाय गावांची नावे…
खेड :- खालुंब्रे, निघोजे, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, मोई, चन्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.
मावळ तालुका :- परंदवाडी, उसे, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळ, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे.
भोर तालुका :- कांबरे, नायगाव, केळवडे
हवेली तालुका :- तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.
पुरंदर तालुका : दिवे, सोनोरी, चांबळी, हिवरे, कोडीत खुर्द, गराडे काळेवाडी
कसा असणार मार्ग हा मार्ग :-
1) पुण्याचा रिंगरोड प्रकल्प हा 6 पदरी असून एकूण 7 बोगदे, 7 अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूल असणार आहे. यासाठी 860 हेक्टर जागा संपादन होणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा एकूण खर्च अंदाजे 1434 कोटी असून महामार्ग बांधणीचा खर्च सुमारे 17 हजार 713 कोटी खर्च अपेक्षित आहे.
[…] प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती :- ‘या’ गावांतून जाणार रिंगरोड प्रोजेक्ट, किती मिळणार मोबदला ? तालुकानिहाय गावांची नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा […]