भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस-वे च्या बांधकामाचा प्रस्ताव केंद्राने मंजूर केला असून भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा एक्सप्रेस वे सध्याच्या राज्य महामार्ग State Highway 27 (Maharashtra) चा एक जलद पर्याय असणार आहे.
याबाबत आपण अपडेट पाहिलं होतं की, अजून या महामार्गाबाबत जिल्हा नियोजनाची बैठक झाली नाहीये. बैठकीनंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी फायनल होणार आहेत. तर ती जिल्हा नियोजनाची पुणे जिल्ह्यातील बैठक जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर या 5 तालुक्यांतील भूसंपादनाच्या कामासाठी सक्षम प्राधिकारी (CALA) म्हणून भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून एक पत्रक काढून भूसंपादन प्रकिया राबवण्यास मंजुरी दिली आहे.
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भीय पत्रान्वये भारतमाला फेज- II परियोजने अंतर्गत पुणे जिल्हयातून जान असलेल्या ग्रिनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाचे पुणे – अहमदनगर – औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे पुणे जिल्हयातील गावांची नावे पहा ..
सदरचा रस्ता ( 0000 km to 82 + 175 km) हा पुणे जिल्हयातील भोर तालुक्यामधील रस्त्याच्या कामाकरिता मौजे कांजळे, वरवे (बु.), कासुर्डी (खेडेबारे) कासुर्डी (गु.मा.) व शिवरे या गावांच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी (भोर – वेल्हा) यांची नेमणूक केली आहे.
पुरंदर तालुक्यातील मौजे थोपटेवाडी, वरवडी , गराडे, कोडीत खुर्द, चाळंबी, पवारवाडी , सासवड, हिवर, दिवे, काळेवाडी सोनारी या गावांच्या भूसंपादनासाठी व दौंड तालुक्यातील मौजे, दिहिटणे, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण, तेलवाडी, राहु, वडगाव बांडे, टाकळी व मौजे पानवली या गावांच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी (पुरंदर – दौंड) यांची नेमणूक केली आहे.
हवेली तालुक्यातील मौजे आळंदी- म्हातोबाची, तरडे, वळती, शिदवणे, सोरतापवाडी, कोरेगाव – मूळ, भवारपुर, हिंगणगाव व मिरवाडी या गावांचे भूसंपादनसाठी उपविभागीय अधिकारी (हवेली) यांची नेमणूक केली आहे.
तसेच शिरुर तालुक्यातील गावांसाठी उरळगाव, सत्कारवाडी, दहीवाडी, बाभुळसर खुर्द, रांजणगाव गणपती, कारेगाव, चव्हाणवाडी व मौजे गोलेगाव या गावांच्या भूसंपादनाचे काम वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी (पुणे शहर – शिरुर) यांची भूसंपादनासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत सक्षम अधिकारी (CALA) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
One Response