2019 मध्ये राज्यात होऊ घातलेली बहुचर्चित – बहुप्रतीक्षित आणि बहुविवादित अशी पदभरती म्हणजे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाची पदभरती. याच पदभरतीच्या परीक्षेचे नव्या वेळापत्रका संदर्भातील शासन निर्णय 26 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार बदलताच शिंदे – फडणवीस सरकारने
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील येणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट – क परीक्षा पुन्हा एकदा सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून स्थगिती देण्यात आली होती असं एक शुध्दीपत्रक काढलं होतं. त्यामुळे या पद भरतीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आलेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची पदभरती करणाऱ्या तरुण – तरुणींचा भ्रमनिरास झाला होता.
परंतु आता याबाबत एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे, त्यांनी या पदभरतीबाबत तारखाही जाहीर केल्या आहेत. यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
Heavy Rain : राज्यात पुन्हा दमदार पाऊस; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील येणाऱ्या आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान ऑफिशिअल नोटिफिकेशन निघणार असून 25 ते 26 मार्चदरम्यान भरती परीक्षा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर 27 एप्रिलपर्यंत निकाल लागणार असून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या असल्याने गैरव्यवहार झाल्याचं आढळलं होतं. त्यामुळे या परीक्षा काटेकोरपणे पार पाडाव्यात असं परीक्षार्थींचं म्हणणं आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती :- पदे
1) आरोग्य सेवक : (पुरूष) 3184 पदे
2) आरोग्य सेविक : 6476 पदे
3) आरोग्य पर्यवेक्षक : 47 पदे
4) औषध निर्माता : 324 पदे
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञान : 96 पदे
नव्या तारखा पहा…
पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होणाऱ्या तारखा – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
परीक्षांचा तारखा – 25 मार्च 2023 ते 26 मार्च 2023
निकाल जाहीर होण्याच्या तारखा – 27 मार्च ते 27 एप्रिल 2023