जगातील इतर देशांबरोबरच भारतातही गेल्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि डिमांड वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती हेही यामागचं एक मोठं कारण आहे. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसह बाजारात आहेत.
पण एक इलेक्ट्रिक कार आहे जी विक्रीच्या बाबतीत इतर सर्व इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा पुढे आहे. आणि त्या इलेक्ट्रिक कारचे नाव Tata Nexon EV आहे, जी देशातच बनलेली आहे.
Tata Nexon EV चे बाजारात वर्चस्व
Tata मोटर्सची सर्वाधिक विक्री होणाऱ्या या इलेक्ट्रिक SUV ने संपूर्ण इलेक्ट्रिक कार मार्केटवर वर्चस्व गाजवलं आहे. एका रिपोर्टनुसार, Tata Nexon EV चा इलेक्ट्रिक कार मार्केटमधील एकूण वाटा 66% आहे. कंपनीने यावर्षी आतापर्यंत Tata Nexon EV च्या एकूण 21,997 युनिट्सची विक्री केली आहे. या वर्षी विकल्या गेलेल्या प्रत्येक 5 इलेक्ट्रिक वाहनांपैकी 3 टाटा नेक्सॉन ईव्ही आहेत.
इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आहे Tata चा दबदबा
टाटा मोटर्सने या वर्षात आतापर्यंत 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे, त्यापैकी 21,997 युनिट्स Tata Nexon EV चे आहेत. याशिवाय टाटाच्या टिगोर ईव्ही (Tigor EV) च्या 7,903 युनिट्सची विक्रीही झाली आहे.
टाटाची टायगर ईव्ही (Tiger EV) देखील बाजारात आली असून काही दिवसांपूर्वी कंपनीने टियागो ईव्ही (Tiago EV) देखील लॉन्च केली आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत टाटाचा दबदबा वाढला आहे, जो फार काळ कमी होणार नाही, असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.